ठळक मुद्देअभ्यासमाला सुरू करण्यात आली आहे.
पाटोदा : जिल्हा परिषदेच्या आडगाव रेपाळ शाळेच्या शिक्षकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विद्यार्थ्यांना ज्ञानदानास सुरुवात केली आहे.शाळेची विद्यार्थी पटसंख्या १५० असून ६ शिक्षक आहेत. मुख्याध्यापक रमेश उगले यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी अभ्यासमाला सुरू करण्यात आली आहे. दररोज दोन शिक्षक शाळेत येऊन शाळा आवारात विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत आहेत. याप्रसंगी शिक्षक सूरज झाल्टे, राहुल चौधरी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामकृष्ण निकम, कचू निकम, भास्कर तनपुरे, संतोषकुमार निकम, भास्कर गायके आदी उपस्थित होते.