शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

जागेचा ताबा शेतकऱ्यांनी भाडेपट्टीने दिल्याने साधुग्रामचा प्रश्न मार्गी लागला

By admin | Published: February 10, 2015 1:53 AM

जागेचा ताबा शेतकऱ्यांनी भाडेपट्टीने दिल्याने साधुग्रामचा प्रश्न मार्गी लागला

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ६० एकर जागेचा ताबा शेतकऱ्यांनी भाडेपट्टीने दिल्याने साधुग्रामचा प्रश्न मार्गी लागला असून, कायमस्वरूपी जागा संपादनासाठी शेतकऱ्यांना सहापट सिंहस्थ टीडीआर (विकास हस्तांतरणीय हक्क) देण्याचा महासभेने मंजूर केलेला प्रस्ताव काही काळापुरता तरी थंड बस्त्यातच राहण्याची शक्यता आहे. सध्या शासनाकडे सदरचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, शासनाने प्रस्ताव मान्य केला तरी त्याची तातडीने अंमलबजावणी होण्याची शक्यता कमीच आहे. तपोवनातील ५४ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून, साधुग्रामसाठी सुमारे २७० एकर जागा कायमस्वरूपी संपादनासाठी महापालिकेमार्फत प्रयत्न करण्यात येत होते. सदर जागा संपादनासाठी महापालिका महासभेने सुरुवातीला जागामालकांना दहापट टीडीआरचा प्रस्ताव मंजूर केला होता, परंतु शासनाने सदरचा प्रस्ताव पुन्हा परत पाठविल्यानंतर महासभेने सहापट टीडीआरचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर नगररचना विभागाने त्यावर हरकती व सूचनाही मागविल्या. त्यानुसार ११ हरकती प्राप्त होऊन त्यातील नऊ जागामालकांनी सहापट टीडीआरला पसंती दर्शविली होती. महापालिकेने पुन्हा महासभेवर प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवून तो शासनाकडे पाठविला आहे. दरम्यान, साधुग्रामसाठी शेतकऱ्यांनी एकरी दहा लाख रुपये भाडेपट्टीने जागा देण्यास संमती दर्शविल्यानंतर महापालिकेच्या ताब्यात सुमारे ६० एकर जागा आली आहे. त्यामुळे सध्या महापालिकेच्या ताब्यात ११४ एकर जागा आल्याने साधुग्रामचा प्रश्न मार्गी लागला असून, उर्वरित सुमारे दीडशे एकर जागेचा प्रश्नही भाडेपट्टीच्या माध्यमातून सुटण्याची चिन्हे आहेत. मुख्यत्वे साधुग्रामच्या जागेचा प्रश्न सुटल्याने महापालिकेसह जिल्हा प्रशासन निश्चिंत झाले आहेत. शासनाकडे पाठविण्यात आलेला सिंहस्थ टीडीआरचा प्रस्ताव तातडीने मंजूर होण्याची शक्यताही कमी असल्याचे आणि महापालिकेलाही त्याची तातडी नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खासगीत सांगितले. राज्यात कुठेही सहापट टीडीआरचा प्रस्ताव नसल्याने आणि तो नाशकात लागू केल्यास राज्यात अन्य धार्मिक तीर्थक्षेत्रीही त्याची मागणी होऊ शकते परिणामी त्यातून अडचणी उत्पन्न होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाकडूनही सदरचा प्रस्ताव थंड बस्त्यात ठेवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)