कसबे सुकेणे : दुधाचे भाव वाढत नसल्याच्या निषेधार्थ मौजे सुकेणे येथील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. १९) सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले, तर दूध कुठेही न ओतता जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वितरित केले.राज्यात सुरू असलेल्या दुष्ट आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मौजे सुकेणे येथील दूध उत्पादक शेतकºयांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत गावातील शेकडो सहकारी विद्यार्थ्यांना दूधवाटप केले. दूध रस्त्यावर ओतण्याऐवजी विद्यार्थ्यांना दूध वितरित करीत या अनोख्या आंदोलनाची चर्चा पंचक्रोशीत होती. सचिन मोगल, संदीप राहणे, सतीश मोगल, किरण देशमुख, साहेबराव राहणे, राजेंद्र निकम, संजय निकम, संजय मोगल, पुंडलिक, जगन अरिंगळे, गौतम चव्हाण, विलास हंडोरे, अशोक भंडारे, गोकुळ सोनवणे, संतोष राहणे, दिलीपखापरे आदींचा आंदोलनात सहभाग होता. या शेतकºयांनी दुधाला भाव मिळालाच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतमालालाहमी भाव मिळालाच पाहिजे या व इतर मागण्याच्या घोषणा देत शेतकºयांनी सरकारचा निषेध केला. मौजे सुकेणे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आजसंग्रहित झालेले दूध वितरित करण्यात आले.यावेळी सतीश मोगल, सचिन मोगल, संदीप राहणे, संजय मोगल यांनी भाजपा सरकार शेतकºयांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष्य करीत असल्याचा आरोप केला.
विद्यार्थ्यांना दूध वाटून घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:22 AM
कसबे सुकेणे : दुधाचे भाव वाढत नसल्याच्या निषेधार्थ मौजे सुकेणे येथील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. १९) सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले, तर दूध कुठेही न ओतता जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वितरित केले.
ठळक मुद्देभाववाढ होत नसल्याचा निषेध : मौजे सुकेणेला आंदोलन