शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पर्यटकांना 'निवास' देताहेत; सुरक्षितता म्हणून माहिती नोंदवा, अन्यथा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 1:58 PM

या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती अथवा उल्लंघन करणारी संस्था महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १४० अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व सदर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार हे प्राधिकृत असतील, असेही जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी शासकीय आदेशान्वये कळविले आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारदेखील वास्तव्यास येण्याची शक्यता नाकारता येत नाही

नाशिक : शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर तसेच सभोवताली काही खासगी जागा मालकांकडून आपले बंगले, फार्महाऊस, रो-हाऊससारख्या प्रॉपर्टी पर्यटकांना भाडेतत्वावर निवासासाठी दिल्या जातात; मात्र हे करत असताना सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून आपल्या जागेत वास्तव्य करणाऱ्या परगावाच्या जिल्ह्याच्या आणि राज्यांच्या लोकांची माहिती अनेकदा जागामालक ठेवत नाही, यामुळे कायदासुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभुमीवर १ जानेवारीपासून राज्य पोलीस अधिनियम१९५१च्या कलम-६८प्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आदेश जारी केले आहे.याआदेशात नमुद केल्यानुसार, पर्यटनस्थळांवर पर्यटक म्हणून समाजकंटक किंवा देशविघातक कृत्य करणारे गुन्हेगारदेखील वास्तव्यास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अशा लोकांकडून सार्वजनिक शांतताभंग करणे, मानवी जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, आरोग्य असुरक्षिता व वित्तहाणी, बॉम्बस्फोट, गोळीबार, दंगली, मारामार्‍यांसारखे प्रकार होण्याची शक्यता आहे. यामुळे अशा गोष्टींवर प्रतिबंध करणे गरजेचा असल्याने खाजगी बंगले व पर्यटन कॅम्प आयोजकांसाठी आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्यानुसार, खाजगी बंगले, फार्म हाऊस यांचे मालक, कॅम्पचे आयोजन करणारे जागा मालक यांनी पर्यटक किंवा अतिथी यांना बंगला किंवा जागा भाडे तत्वावर देतांना पोलीसांनी बंधनकारक केलेल्या नियम व कॉलमनुसार माहिती आपल्या नोंदवहीत ठेवणे बंधनकारक असणार आहे, यात पर्यटक अथवा अतिथी यांची एकूण संख्या, सर्वांची नावे, पत्ते, ओळखपत्र, सर्वांचे मोबाईल क्रमांक, ज्या वाहनातून आले त्या वाहनाचा क्रमांक, पर्यटक किंवा अतिथी हे कोठून आले, आल्याचा दिनांक व जाण्याचा दिनांक व स्वाक्षरी आदी बाबींची नोंद घेण्यात यावी. पर्यटक व अतिथी यांचे आधार कार्ड किंवा कोणत्याही स्वरूपाचे ओळखपत्र घेवून त्याची नोंद ठेवावी आणि पोालीस ठाण्यांना ती माहिती दरमहा सादर करावी, असे पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती अथवा उल्लंघन करणारी संस्था महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १४० अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व सदर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार हे प्राधिकृत असतील, असेही जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी शासकीय आदेशान्वये कळविले आहे.

टॅग्स :tourismपर्यटनNashikनाशिकPoliceपोलिसgodavariगोदावरीtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरTapovanतपोवन