नाशिक : गर्दी व्यवस्थापन आणि ताणतणावाच्या कालावधीत जोखीम पत्करून अल्प मानधनावर सेवा बजावणाºया होमगार्ड््सला विविध कारणांवरून अपात्र ठरविण्यात येत असून, सुमारे साडेसातशे होमगार्ड््सच्या सेवांवर गंडांतर आले आहे. होमगार्ड््सच्या सेवेत सातत्य ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून कवायत किंवा उजळणी वर्ग बंधनकारक असताना ते शासनाकडूनच घेतली जात नाही आणि कवायतीत आणि उजळणी वर्गात सहभाग घेतला नसल्याचे निमित्त करून त्यांना दूर केले जात असल्याने होमगार्ड अस्वस्थ झाले आहेत. केवळ यात्रा, जत्राच नव्हे तर वाहतुकीच्या वेळी तसेच दंगल, सामाजिक ताणतणाव आणि मतदानाच्या वेळी होमगार्ड सेवा बजावत असतात.
साडेसातशे होमगार्ड््सच्या सेवेवर आले गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 12:17 AM