नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथे आर. बी. फाऊंडेशनच्यावतीने कोरोना संसर्गाच्या काळात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोविड योध्दांचा गौरव करण्यात आला.गेल्या पाच ते सहा महिन्यापासून ग्रामीण भागात शासकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना महामारिच्या काळात रात्र दिवस काम करत आहेत. आपल्या भागात कोरोनाचे रुग्ण कशाप्रकारे कमी होतील यासाठी ते प्रयत्न करत असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचा गौरव करण्याचा निर्णय आर. बी. फाऊंडेशन घेत उपक्रम राबविला. दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के, डॉ.राहुल हेंबाडे, डॉ.अशोक सुयर्Þवंशी, ग्रामविकास अधिकारी प्रविण बुरसे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे तसेच आरोग्य सेविका, कर्मचारी, आशा सेविका यांचा ‘कोविड योद्धा‘ म्हणुन सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आर. बी. फाऊंडेशनचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य अशोक आव्हाड, निवृत्ती बेदाडे, सुनील आव्हाड, रामनाथ आव्हाड, दत्तात्रय आव्हाड, गणपत घुले, संपत आव्हाड, नवनाथ आव्हाड, भगवान गारे, समाधान आव्हाड, भगवान आव्हाड, शिवाजी आव्हाड, शरद शेळके आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दापूरला कोरोना योध्द्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 6:12 PM