खामखेडा : कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता समाजात जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य कर्मचारी तसेच आशासेविकांनी पार पाडले. पंचप्राण युवा फाउण्डेशन महाराष्ट्र राज्य देवळा तालुक्याच्या वतीने खामखेडा, ता.देवळा येथील आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी तसेच आशासेविकांचा कोरोनायोद्धा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कोरोनासारख्या जीवघेण्या काळात आपले कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पंचप्राण युवा फाउण्डेशन महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष सूरज पाटोदकर, मार्गदर्शक सतीश शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा तालुकाध्यक्ष जगदीश निकम, आरोग्य समितीप्रमुख डॉ. चंद्रकांत निकम, साक्षरता समितीप्रमुख प्रमोद उगले, शैक्षणिक समितीप्रमुख रवींद्र निकम, वैभव पवार, विलास माळी, वाल्मीक केदारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदाकिनी दाणी, आरोग्य सहाय्यक संजय कुंभार्डे, गोकुळ पवार, औषध निर्माण अधिकारी हेमंत मोरे, आरोग्यसेवक संजय भामरे, दिनेश शेवाळे, संतोष शेरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रजिया कुरेशी, आरोग्यसेविका सुरेखा देवरे, शारदा केदारे, लता ठाकरे, आशा गटप्रवर्तक स्वाती जाधव, वाहनचालक समाधान शेवाळे, मनोज पानपाटील तसेच खामखेडा, भऊर, सावकी, विठेवाडी येथील आशासेविका उपस्थितीत होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र निकम यांनी केले, प्रस्तावना संजय कुंभार्डे यांनी मांडली व आभार जगदीश निकम यांनी मानले.
कोरोनायोद्ध्याचा खामखेडा येथे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 6:06 PM
खामखेडा : कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता समाजात जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य कर्मचारी तसेच आशासेविकांनी पार पाडले. पंचप्राण युवा फाउण्डेशन महाराष्ट्र राज्य देवळा तालुक्याच्या वतीने खामखेडा, ता.देवळा येथील आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी तसेच आशासेविकांचा कोरोनायोद्धा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ठळक मुद्देकोरोनासारख्या जीवघेण्या काळात आपले कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून या सोहळ्याचे आयोजन