मालेगाव कॅम्प : मतमोजणीच्या सुरुवातीला चार ते पाच फेऱ्यांमध्ये शेख आसिफ सुमारे दोन हजार मतांनी आघाडीवर होते. नंतरच्या पंधरा मतमोजणी फेऱ्यांमध्ये त्यांची पीछेहाट होत गेली. अखेरपर्यंत मताधिक्य न वाढल्याने शेख यांना पराभवास सामोरे जावे लागले. त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याने त्यांनी मतदान केंद्रातून काढता पाय घेतला.मालेगाव मध्य विधानसभेची मतमोजणी येथील शिवाजी जिमखान्यामध्ये सकाळी सुरू झाली. मतमोजणी सुरुवातीला धिम्या गतीने सुरू होती. केंद्रातील पहिल्या फेरीचा निकाल साडेनऊ वाजता घोषित करण्यात आला. पहिल्या फेरीत काँग्रेसचे शेख आसिफ यांना ५००४ एमआयएमचे मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना ३९८९ एवढी मते पडल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अशीच मतांची आघाडी दुसºया, तिसºया व सहाव्या फेरीपर्यंत शेख आसिफ यांनी कायम ठेवली; परंतु सातव्या फेरीनंतर मतदानाचे चित्र पालटले. आठव्या फेरीपासून मुफ्ती मो. इस्माईल यांनी आघाडी घेत प्रत्येक फेरीत जास्त मते मिळविली. अखेरपर्यंत दोन हजार, पाच हजारांची आघाडी घेत विजयाकडे घोडदौड सुरू ठेवली. बदलणाºया आकडेवारीमुळे काँग्रेस व एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या चेहºयावर तणाव दिसला. एमआयएमचे असंख्य कार्यकर्ते येथील मोहन चित्रपट गृहाजवळ जमाव करून उभे होते तर काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य रुग्णालयाजवळ होते. निकालाची आकडेवारी जमावावर परिणाम करीत होती. झिंदाबादच्या घोषणांनी दोन्ही परिसर दुमदुमून गेले होते तर सहाव्या फेरीनंतर काँग्रेस कार्यकर्ते पांगू लागले तर मतदान केंद्रातील शेख आसिफ यांच्या निष्ठावंत सदस्यांनी निकालाचा अंदाज घेत काढता पाय घेतला.मालेगाव कॅम्प : मालेगाव मध्यमध्ये एकूण तेरा उमेदवार रिंगणात होते. त्यांच्यापैकी केवळ तीन उमेदवारांना टपाली मतदान झाले आहे. यापैकी एकूण ८२९ मतदान झाले असून त्यापैकी तब्बल २९७ मतदान अवैध ठरले आहे. त्यामुळे या आकडेवारीवरुन चर्चा रंगली होती. मालेगाव मध्य क्षेत्रात एकूण ८२९ टपाली मतदानापैकी शेख आसिफ यांना १८०, दीपाली वारूळे (भाजप) १२, मुफ्ती मोहंमद इस्माईल (एमआयएम) यांना ३३६ टपाली मतदान मिळाले आहे तर यामध्ये ५३२ मते ही वैध ठरली आहे व २९७ मते अवैध ठरली आहेत, तर ४ टपाली मते ‘नोटा’साठी वापरले होते. उर्वरित दहा उमेदवारांना एकही टपाली मतदान मिळाले नाही; परंतु ८२९ पैकी तब्बल २९७ मते अवैध ठरल्याने या मतदानाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून आले.
मौलाना मुफ्तींच्या विजयाने जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:43 PM