शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

दिवाळी सुटीत गावी जा, पण पाणी साठवू नका

By admin | Published: October 26, 2016 12:18 AM

आवाहन : डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना

नाशिक : शहरात डेंग्यूने अद्यापही पिच्छा सोडलेला नाही. डेंग्यूची लागण होण्यास कारणीभूत असलेल्या एडीस जातीच्या डासांच्या अळ्या या स्वच्छ पाण्यात आढळून येत असल्याने नागरिकांनी दिवाळी सुटीत बाहेरगावी जाताना घरात पाणी साठवून ठेवू नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे.आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मागील तीन वर्षांत मनपा कार्यक्षेत्रातील संशयित व डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांचा आढावा घेतला असता नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर संशयित व डेंग्यू दूषित रुग्ण आढळून आले होते. सदर रुग्ण आढळलेल्या परिसरातील कारणांचा शोध घेतला असता दिवाळीनिमित्त सुटीत बरेच नागरिक बाहेरगावी जाताना घरातील पाणीसाठे तसेच ठेवून जातात. बरेच दिवस सदर पाणी विनावापर पडून राहत असल्याने स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. परिणामी, परिसरात डेंग्यूच्या आजाराचा फैलाव होतो. त्यामुळे, नागरिकांनी सुटीनिमित्त बाहेरगावी जाताना घरात पाणी साठवून ठेवू नये. गावी जाताना सर्व पाणी ओतून द्यावे व भांडी कोरडी करून ती पालथी मांडून ठेवावीत. जे पाणी साठे नष्ट करता येणे अशक्य आहे अशा पाणीसाठ्याला घट्ट झाकण लावावे अथवा कापडाने झाकण बांधून ठेवावे. जेणेकरून डास अशा पाण्यात अंडी घालणार नाही व रोगाचा प्रसार होणार नाही. नागरिकांनी स्वत:च्या आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सावधानता पाळावी, असे आवाहन डॉ. डेकाटे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)