शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

विदयार्थ्यांच्या घरी जाऊन शाबासकीची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 10:11 PM

नाशिक : कोरो ना संसर्गाचा पाश्र्­वभूमीवर दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा सामुदायिक गुणगौरव करणे शक्य नसल्याने राष्ट्रातील एका शैक्षणिक संस्थेने ...

ठळक मुद्देगुणगौरव : नाशकातील शाळेचा आगळावेगळा उपक्रम

नाशिक : कोरो ना संसर्गाचा पाश्र्­वभूमीवर दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा सामुदायिक गुणगौरव करणे शक्य नसल्याने राष्ट्रातील एका शैक्षणिक संस्थेने थेट गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा पाठीवर कौतुकाची थाप देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने गुणगौरव सोहळा साजरा केला आहे.नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने संस्थेच्या शहरी व ग्रामिण भागातील शाळेतील दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यां च्या घरी जाऊन त्यांना प्रमाणपत्र, रोख बक्षिस देऊन त्यांच्या पाठिवर शाबासकीची थाप दिल्याने विद्यार्थी व त्यांचे पालकही भाराऊन गेलेमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडुन दहावी व बारावीच्या निकाल जाहिर झाल्यानंतर शैक्षणिक संस्था, शाळा,महाविदयालये तसेच सामाजिक संस्थाकडुन दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. त्याचप्रमाणे नशिप्रकडूनही संस्थच्या शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये दहावी व बारावीत प्रथम आलेल्या गुणवंत विदयार्थ्याचा सत्कार करण्यात येतो. परंतु या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने विदयार्थी गुणगौरव समारंभ घेता आला नाही. मात्र या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला पाहिजे व त्यांच्या पाठिवर शाबासकीची थाप दिली पाहिजे या विचाराने संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल व सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी संस्थेतील शहरी व ग्रामिण भागातील शाळेतील गुणवंत विदयार्थ्याच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंतीचे औचित्य साधुन संस्थेच्या शहरी व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरीसंबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शाळांचे पदाधिकारी, शिक्षक यांनी त्यांच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन त्यांना प्रमाणपत्र, रोख बक्षिस व स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला.या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सामूहिक गुणगौरव समारंभ घेता आला नाही, संस्थेच्या शहरी व ग्रामिण भागातील शाळाचे पदाधिकारी गुणवंत विद्यार्थ्यां च्या घरी गेले व त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. अशा परिस्थितीत ही गुणवंत विदयार्थी यांचा सत्कार झाल्याने पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.- अश्विनीकुमार येवला, सचिव, नाशिप्र

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य