मालेगाव : शहरात बकरी ईद शांततेत व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील पोलीस कवायत मैदानात मुख्य नमाज अदा करण्यात आली. यासह शहरात नऊ ठिकाणी व विविध प्रार्थना स्थळांमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली.शनिवारी सकाळी पोलीस कवायत मैदानावर मुख्य नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलाना इम्तियाज इकबाल यांनी बयान केले. शहरातील मुख्य इदगाह मैदानासह नऊ ठिकाणी व प्रार्थना स्थळांमध्ये ईदची नमाज अदा करून दुवा पठण करण्यात आले. नमाजनंतर शहरातील मुख्य कत्तलखान्यासह मनपाने उभारलेल्या चौदा तात्पुरत्या कत्तलखान्यात कुर्बानी दिली जात होेती. गोवंश हत्याबंदी कायद्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले होते. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांच्या तपासणीनंतर जनावरांची कुर्बानी दिली जात होती. दरम्यान, बकरी ईदच्या मुख्य नमाजाच्या वेळीस मौलाना इम्तियाज इकबाल यांचा जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, प्रांताधिकारी अजय मोरे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शांतता व एकात्मता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बकरी ईद उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:15 AM