निकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेल शिवारात बिबट्याने पुन्हा एकदा गुरुवारी रात्री हल्ला करत गोठ्यात बांधलेली शेळी ठार केल्याची घटना घडली. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील वनविभागाने त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. निकवेल शिवारातील ही दुसरी घटना असल्यामुळे येथील ग्रामस्थ दहशतीमध्ये वावरत आहेत. येथील शेतकरी लक्ष्मण रामभाऊ सोनवणे शेतात गेले असता गोठ्यात शेळी मृत झालेली दिसली. तसेच त्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले. त्यांनी त्वरित वनकमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. वन कर्मचारी मोरे यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. गावात दुसºया घटना घडली असून, पंढरीनाथ महाजन यांचे दीड वर्षाचे वासरू बिबट्याने ठार केले होते.
बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:07 AM