ब्राह्मणगाव : परतीच्या पावसाच्या फटक्याने वाढ न झाल्याने कांदे पिकात शेतकऱ्यांनी मेंढ्या सोडून आपला संताप व्यक्त केला आहे. येथे परतीच्या पावसाचा परिणाम अद्याप पिकांवर पडत असून त्याचा फटका येथील कांदा उत्पादक शेतकरी देविदास गोपाळ अहिरे यांच्या अडीच एकर कांद्याला बसला आहे. कांदे पीक तीन महिन्याचे होऊनही त्याची वाढ होत नसल्याने शेवटी कंटाळून त्यांनी उभ्या पिकात मेंढ्या सोडून दिल्या. या अडीच एकर क्षेत्रात ९० हजार रु पये खर्च करून हाती एक रु पयाही उत्पन्न न आल्याने हताश होऊन त्यांनी कांदे पिकात मेंढ्यांना खाण्यासाठी सोडून दिल्या. येथे या वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मका, द्राक्ष, बाजरी, भाजीपाला, कांदा रोपे या सर्वच पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. आज पाऊस बंद होऊन महिना उलटुन ही अद्याप पिकांवर त्याचा परिणाम व फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कांदा उत्पादक शेतकरी देविदास गोपाळ अहिरे यांच्या गट न. ८४७ मध्ये ९० हजार रु पये खर्च करून आडीच एकर कांदा लागवड केली. मात्र सदर कांद्यावर करपा रोग आल्याने कांद्याची वाढच झाली नाही.तीन महिने पूर्ण होऊनही कांद्याचे वाढ होत नसल्याने शेवटी कंटाळून त्यांनी उभ्या पिकात मेंढ्या चारून दिल्या. नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकºयांना मोठे आर्थिक संकटास तोंड द्यावे लागत असून नवीन सरकारच्या घोषणांकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
कांदा पिकात सोडल्या मेंढ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 3:53 PM
ब्राह्मणगाव : परतीच्या पावसाच्या फटक्याने वाढ न झाल्याने कांदे पिकात शेतकऱ्यांनी मेंढ्या सोडून आपला संताप व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : वाढ न झाल्याने शेतकरी हतबल