नाशिक/कसबे सुकेणे : जीवन हे सुख-दु:खाचे रहाटगाडगे असून, मनुष्य हा त्या चक्रातच फिरत असतो. अलीकडच्या काळात मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढले असून, परमेश्वरामुळे सर्व दु:खांचे हरण होऊन सर्व सुखप्राप्ती शक्य होते, असे विवेचन महंत वर्धनस्थ बीडकरबाबा शास्त्री यांनी केले.निफाड तालुक्यातील लालपाडी येथे श्रीमद् ब्रह्मविद्या विचार मालिका प्रवचन सोहळ्यातील प्रवचनात बाबाजी मार्गदर्शन करत होते. यावेळी बाबाजी म्हणाले की, श्रीगोविंद प्रभू हे सर्व भक्तांचे माय-बाप होते. भक्तांच्या लहान लेकरांचा सांभाळ करण्यापासून ते रस्ते झाडण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली. भक्तांचे दु:ख निवारण्यासाठी श्री प्रभू धावून गेलेत. दरम्यान, याप्रसंगी महंत चिरडेबाबा यांनी श्रीमद् ब्रह्मविद्या विचार मालिका म्हणजे काय हे स्पष्ट केले. यावेळी महंत सरळबाबा, महंत हिवरखेडकरबाबा, मोहनराज अमृते, निलेश बिडगर तसेच संत-महंत आणि बीडकर गादीच्या सव्वाशे शिष्य गाद्या, नातू गाद्या व बीडकर महानुभाव परिवार तसेच निफाड, चांदोरी, सुकेणे, वऱ्हेदारणा, सायखेडा, लालपाडी आदि परिसरातील भाविक उपस्थित होते.
परमेश्वरामुळे सर्व सुखप्राप्ती शक्य : बीडकर शास्त्री
By admin | Published: December 22, 2014 12:36 AM