सिन्नर : तालुक्यातील भाटवाडी येथील देव नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप बंधाºयाची दुरुस्ती जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आली आहे. चेवडीच्या बंधाºयातून एक हजार हायवा गाळ वाहून नेत परिसरातील शेतकऱ्यांनी आपली शेती सुपीक बनवली आहे.देव नदीवरील चेवडी बंधाºयात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाणी साठवणुकीवर त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे या बंधाºयातील गाळ काढण्याची मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे शेतकरी व ग्रामस्थांनी केली होती. आमदार वाजे यांनी त्यासाठी पाठपुरावा करीत शासनाकडून डिझेलसाठी निधी मंजूर करून आणला. युवामित्र व टाटा ट्रस्टने मशिनरी उपलब्ध करून दिली. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कामातून निघालेला जवळपास एक हजार हायवा गाळ शेतकºयांनी स्व:खर्चाने वाहून नेला आहे. त्यातून त्यांची शेती सुपीक होण्यास मदत होणार आहे. १८ हजार घनमीटर गाळ उपसण्यात आल्याने बंधाºयातील जलसाठा वाढण्यास हातभार लागणार आहे.भाटवाडी परिसरातील पाचोरे वाहळात छोटा रिचार्ज बंधारा बांधण्यासाठी आमदार वाजे यांनी तीन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, या बंधाºयाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या बंधाºयातील पाण्याने परिसरातील विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार असून, रब्बीच्या हंगामातील पिकांना शेवटचे पाणी देणे शक्य होणार आहे. भाटवाडी गावातील शेतजमिनी पाण्याने ओल्या व्हाव्यात यासाठी वडगाव सिन्नरमध्ये देव नदीवर ब्रिटिश काळात बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयातील पाणी थेट गावपाटाने संपूर्ण शिवारात फिरते. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी या गावपाटाची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायत दरवर्षी पुढाकार घेत असते. युवामित्र त्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी उपलब्ध करून देते, तर ग्रामपंचायत डिझेलचा खर्च उचलते. यंदाही पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात आल्याने भाटवाडीच्या संपूर्ण शिवारात पाणी फिरणार असून, शेती हिरवीगार होण्यास हातभार लागणार आहे.
देव नदीवरील बंधाऱ्यातून गाळ उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 5:55 PM
सिन्नर तालुक्यातील भाटवाडी येथील देव नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप बंधाºयाची दुरुस्ती जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आली आहे. चेवडीच्या बंधाºयातून एक हजार हायवा गाळ वाहून नेत परिसरातील शेतकऱ्यांनी आपली शेती सुपीक बनवली आहे.
ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजनेतून काम