वणी : परिसरात शुक्र वारी रात्री चे सुमा रास जोरदार पर्जन्य वृष्टी झाल्याने देवनदीला पुर आला तर नदया नाले दुथडी भरून वाहु लागले असुन धरण क्षेत्रातील पाणी साठा वाढल्या ने पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता उभी ठाकली आहे. वणी व परिसरात मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली त्याबरोबरसप्तशृंगगड़ावर तुफान पाऊस झाला. सप्तशिखरातील पर्वत रांगा- मधुन पाण्याचे परवाह तळाशी जाऊन भातोड़े येथील नदी द्वारा वणीच्या देवनदीत हे पाणी पोहचल्याने देवनदीला पुर आला होता.हे पाणी ओझरखेड़ धरणात जात असल्याने धरण साठयात कमाली ची वाढ झाली आहे ओझरखेड़ धरण यापूर्वीच 100त्न भरले असुन सांडवी वरून वाहणारे पाण्याचा प्रवाह यामुळे ते थे नयन मनोहर नैसर्गीक द्ष्य पाहण्यासाठी पर्यटका ची गर्दी वाढली आहे़शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरणपावसाची हजेरी व धरणाची क्षमता यामुळे पाण्याचा विसर्गकरण्याची स्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान गणपती स्थापनेदिनी वरूणराजाने जोरदार हजेरी लावली तसेज आज शानेवारीही हजेरी लावल्याने गणपतीच्या सोंडेत पाऊस अडकला व हा पाऊस बारा दिवस पडणार अशी चर्चा रंगु लागली आहे दरम्यान पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असुन सामान्य जनजीवन विस्कळीत आहे.
वणी येथील देव नदीला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:57 AM