नाशिक : रविवार कारंजावरील सिद्धिविनायक मंदिर, इंद्रकुंड तसेच गोदाकाठावरील गंगा गोदावरी मंदिरासह गंगेकाठच्या परिसरातील गोदाकाठ हजारो दिव्यांनी गोदाकाठ झळाळून उठला होता.मंगळवारी झालेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी हिंदू धर्मीयांची देवदिवाळी, भगवान कार्तिकेयाचा जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.कार्तिकी पौर्णिमेलादेखील पवित्र स्नानाचे महात्म्य असल्याने मंगळवारी सकाळपासूनच नागरिकांनी स्नानासह दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांनी मोरपिसे घेऊन दर्शन घेण्यासाठी लावलेल्या रांगा थेट शनिचौकापासून अधिक दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या.भगवान कार्तिकेयाचे मंदिर केवळ कार्तिक पौर्णिमेच्या एका दिवसासाठीच महिलांना दर्शन खुले असते. त्यामुळे कार्तिक मासात येणाऱ्या पौर्णिमेच्या तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा, असेही संबोधले जाते. ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाची सांगता असते. त्यामुळे याच दिवसाला देवदिवाळी असेदेखील संबोधले जाते. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे.विविध देवस्थानात जे दीपस्तंभ असतात ते सुद्धा पेटवितात. कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषत: शिवमंदिरातून त्रिपूर वाती लावतात. सर्व मंदिरे देवच दिवाळी साजरी करीत आहेत,अशा तºहेने उजळून निघतात. जणू काही देवांनीच मंदिरे प्रकाशमान केली आहेत, असा आभास निर्माण होण्यासारखी स्थिती इंद्रकुंड आणि गोदाकाठावरील मंदिरांमध्ये दिसून येत होती.गोदेत दिवसभर दीपदानदेवदिवाळी असल्याने मंगळवारी दिवसभरदेखील गोदेत दीपदान करण्याचे पुण्य पदरात पाडून घेतले जात होते. त्यामुळे दिवसा गंगास्नानासह दीपदान आणि फुलांनी पात्र ओसंडून वहात होते, तर सायंकाळी गोदेत सोडलेल्या तरंगणाºया दिव्यांचे दृश्य भाविकांचे मन मोहून घेत होते.
गोदाकाठ झळाळला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:45 AM