शहरं
Join us  
Trending Stories
1
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
3
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
4
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
5
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
6
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
7
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
8
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
9
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
10
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
11
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
12
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
13
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
14
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
15
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
16
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
17
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
18
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

गोदाकाठावरील भाजीबाजार इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:23 PM

नाशिक : गत शतकापेक्षाही अधिक काळापासून गोदाकाठावर बसणारा भाजीबाजार कोरोना लॉकडाऊननंतर कायमस्वरूपी इतिहासजमा झाला आहे. आता बहुतांश भाजीविक्रेते त्यांना निर्धारित करून दिलेल्या गणेशवाडीतील भाजीबाजारातच दुकान मांडून बसू लागले आहेत.

नाशिक : गत शतकापेक्षाही अधिक काळापासून गोदाकाठावर बसणारा भाजीबाजार कोरोना लॉकडाऊननंतर कायमस्वरूपी इतिहासजमा झाला आहे. आता बहुतांश भाजीविक्रेते त्यांना निर्धारित करून दिलेल्या गणेशवाडीतील भाजीबाजारातच दुकान मांडून बसू लागले आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकदेखील गणेशवाडीतील आयुर्वेदिक कॉलेजसमोरील भाजीबाजारात जाऊन खरेदी करू लागल्याने सुमारे दीड दशक लोंबकळलेला प्रश्न मार्गी लागला आहे.नाशकात २००३च्या कुंभमेळ्याच्या पूर्वीपासूनच भाजीबाजार अन्यत्र हटविण्याच्या हालचालींना प्रारंभ झाला. त्यावेळी कुंभमेळा काळात भाजीविक्रेत्यांनी सहकार्य केल्याने तो वाद तात्पुरता शमला होता. परंतु, भाजीबाजारामुळे गोदावरीचे प्रदूषण होऊन अस्वच्छतेमुळे येणाऱ्या भाविकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच त्यामुळे भाविकांनाही अस्वच्छ नाशिकचे दर्शन घडते, असे आक्षेप घेत महापालिकेने भाजीबाजार हटविण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे २००५ पासून गंगेवरील भाजीबाजाराचा वाद अधिकच चर्चेत राहू लागला. तत्कालीन आयुक्त विमलेंद्र शरण यांनी पाण्याचा मारा करून तसेच बॅरिकेड््स टाकून भाजीबाजार हटविण्याची कारवाई केली होती. दरम्यान, २००७ मध्ये गंगामाई भाजीविक्रे ता संघाने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर भाजीबाजार हटविण्याच्या मोहिमेवर सुनावणी सुरू झाली. त्यानंतर २०११ साली न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली.दरम्यान, महापालिकेने जिल्हा न्यायालयात अपील केल्यानंतर न्यायालयाने गंगेवरील भाजीबाजार हटविण्यावरील स्थगिती उठविली. त्यानंतरदेखील ग्राहक येणार नाही, या भीतीपोटी प्रदीर्घ काळ भाजीविक्रेते या बाजारात स्थलांतरित झाले नव्हते. अखेरीस आता दीड दशकाच्या संघर्षानंतर बहुतांश भाजीबाजार गणेशवाडीत भरू लागला आहे.---------------------------४८६ ओट्यांचा बाजार४८६ ओट्यांची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली होती. प्रारंभी या लिलावप्रक्रि येपासून गंगाघाटावरील विक्रे त्यांनी लांब राहणेच पसंद केले. मात्र, नंतर विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळू लागल्याने त्यास शासकीय दरापेक्षा जास्त दराची बोली स्थानिकांनी लावली.------------------------------४आयुर्वेदिक कॉलेजसमोरील जागेत दहा कोटीरु पये खर्च करून पर्यायी भाजीमंडई बांधण्यात आली होती. मात्र, विक्र ेत्यांनी याठिकाणी स्थलांतरित होण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रदीर्घ काळ या मंडईचा ताबा भिकारी, गर्दुल्ले आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला होता.--------------------भिकारी, गर्दुल्ल्यांचारात्री वावरदशकभर याच बाजारात मुक्काम टाकलेले भिकारी, गर्दुल्ले सध्यादेखील रात्रीच्या सुमारास पुन्हा भाजीबाजारात मुक्कामाला येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांकडून दिवसभर मिळणाºया प्रतिसादावर भाजीविक्रेते खूश असले तरी रात्री मात्र भिकारी, गर्दुल्ले परतत असल्याने त्यांचा महापालिकेने कायमस्वरूपी बंदोबस्त लावावा, अशी मागणी भाजीविक्रेत्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक