गोदेच्या प्रांगणात दरवर्षी भरणाऱ्या वसंत व्याख्यानमालेचे १९९९ हे अमृतमहोत्सवी वर्ष होते. त्याची धुरा त्यावेळी माजी खासदार माधवराव पाटील आणि जयप्रकाश जातेगावकर यांच्याकडे होती. त्यावेळी जातेगावकर यांनी अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने त्या सोहळ्यासाठी लतादीदींना आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रस्ताव मांडल्यावर सर्वांनी तो उचलून धरला. लतादीदीदेखील त्या कार्यक्रमासाठी आल्या. यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर झालेल्या त्या शुभारंभाच्या सोहळ्यात पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेदेखील होते. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात दीदींनी मोजकेच बोलून नाशिकप्रती असलेला स्नेहदेखील प्रकट केला. या गोदाकाठावरील प्रांगणातच कुसुमाग्रजांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे त्यांना समजल्यानंतर दीदींनी तात्यासाहेबांप्रती असलेल्या त्यांच्या भावना व्यक्त करण्यास शब्द अपुरे असल्याचे सांगितले. तसेच तात्यासाहेब इथेच कुठेतरी असतील, असे म्हणत त्यांना स्वरांजली अर्पण करीत असल्याचे म्हणत ‘मोगरा फुलला’चे सूर गुणगुण्यास प्रारंभ केला.दीदींच्या हस्ते तात्यासाहेबांनीस्वीकारला नाशिकभूषणकुसुमाग्रजांनी नव्वदच्या दशकापासूनच पुरस्कार स्वीकारणे बंद केले होते. त्यामुळे रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने दिला जाणारा नाशिकभूषण पुरस्कार ते स्वीकारण्याची शक्यताच वाटत नव्हती. मात्र, तरीदेखील सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून तात्यासाहेबांना विचारायचे ठरवले. अखेरीस नाशिकवरील प्रेमापोटी तात्यासाहेब तो पुरस्कार स्वीकारण्यास राजी झाले. त्यावेळी जातेगावकर यांनी हृदयनाथ मंगेशकर यांना दूरध्वनीवरून माहिती देताच लतादीदींच्या हस्ते तो पुरस्कार द्यायला येतील, असे सांगितले. त्यानुसार १९ जानेवारी १९९९ रोजी तात्यासाहेबांनी दीदींच्या हस्ते नाशिकभूषण पुरस्कार स्वीकारल्याचे जातेगावकर यांनी सांगितले.संत ज्ञानेश्वरांच्या शब्दांना लतादीदींच्या सुरांच्या साजाने तात्यासाहेबांना खºया अर्थाने भावसुमनांजली वाहिली गेली. तसेच दीदींच्या त्या मखमली स्वरांची जादू त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी त्यावेळी नाशिककरांना अनुभवता आली.
गोदाकाठी ‘मोगरा फुलला’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 1:22 AM