नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकºयांची खुलेआम लूट केली जात असून, विक्रीसाठी माल आणणाºया शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार गोदा व्हॅली फार्मर प्रोड्युसर संस्थेचे रवि अमृतकर यांनी बाजार समितीचे प्रशासकांकडे केली आहे.या संदर्भात दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाºया शेतमालाची नोंद बाजार समितीकडे असणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकºयांच्या समस्या निर्मूलनासाठी आणि समस्यांच्या मुळाशी आपल्याला पोहोचता येईल. शेतकºयांना आॅनलाइन पेमेंटचे महत्त्व आता पटू लागल्यामुळे बाजार समितीमधील व्यवहारांचे शेतकºयांचे पेमेंट हे व्यापाºयांनी तत्काळ बॅँकेमार्फत करण्याचे बंधन घालून द्यावे जेणे करून शेतकºयांना त्याचा फायदा होणार आहे. व्यापाºयांमध्ये खुली स्पर्धा असण्यासाठी शेतमाल जास्तीत जास्त किमतीत खरेदी व्हावा यासाठी उपाययोजना कराव्यात. शेतमालाची मोजणी पारदर्शकपणे होऊन शेतकºयांना ते पेमेंट मिळेल याची व्यवस्था करावी. शेतकºयांच्या समस्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी रात्री येणाºया श्ोतमालाच्या विक्रीसाठी शेतकºयाला संरक्षण, शेतकºयाला सुविधा मिळाव्यात. बाजार समितीमध्ये उजेड असावा, सध्या काही ठिकाणी अंधारात खरेदी-विक्री सुरू असते. शेतकºयाला आणि व्यापाºयांना भयमुक्त, दहशतमुक्त वातावरण हवे, पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील यासाठी बाजार समितीने प्रयत्न करावेत, त्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे असावेत. हमालांना पोलिसांकडून वर्तुणुकीचा दाखला असल्याशिवाय प्रवेश देऊ नये, गुंडागर्दी मोडून काढावी. बाजारातील वाहतूक व्यवस्था सुरुळीत राहील, पार्किंग राहील याचे नियोजन करावे. बाजार समितीचे उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी उपाययोजना आखावेत. शेतकºयांना विश्रामाची व्यवस्था, मालाची सुरक्षितता, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी उपलब्ध असावे, पेठरोड व नाशिकरोड येथील बाजार समिती आवारातील रस्त्यांची अल्पावधीत झालेली दुरवस्था पाहता ती दुरुस्त व्हावी, अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकºयांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी तात्काळ कारवाई करावी अशीदेखील मागणी होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी माल आणणाºया शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.व्यापाºयांमध्ये खुली स्पर्धा असण्यासाठी शेतमाल जास्तीत जास्त किमतीत खरेदी व्हावा यासाठी उपाययोजना कराव्यात.शेतमालाची मोजणी पारदर्शकपणे होऊन शेतकºयांना ते पेमेंट मिळेल याची व्यवस्था करावी.शेतकºयांच्या समस्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी. अशा मागण्या शेतकºयांनी केल्या आहेत.
गोदा व्हॅलीचा आरोप : प्रशासकांना लक्ष देण्याची विनंतीबाजार समितीत शेतकºयांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:44 AM
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकºयांची खुलेआम लूट केली जात असून, विक्रीसाठी माल आणणाºया शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार गोदा व्हॅली फार्मर प्रोड्युसर संस्थेचे रवि अमृतकर यांनी बाजार समितीचे प्रशासकांकडे केली आहे.
ठळक मुद्देशेतमाल जास्तीत जास्त किमतीत खरेदी व्हावा समस्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी