नाशिक : गेल्या रविवारी गोदावरीला महापूर आल्याने नाशिककरांना मोठा फटका बसला. या महापूरातून हळुहळु गोदाकाठ सावरू लागला असून शनिवारी (दि.१०) गोदावरीच्या पातळीत पून्हा वाढ झाल्याचे दिसून आले. गंगापूर, आळंदी या दोन्ही धरणांमधून सकाळपासून विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीला पूरसदृश्य स्थिती पहावयास मिळाली. सायंकाळी उशिरापर्यंत गोदावरीतील दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत बुडाली.गोदाकाठ महापूरानंतर सावरताना पहावयास मिळत आहे. महापूराच्या तीव्रतेनंतर त्याच्या खाणाखूणा गोदाकाठवर फे रफटका मारताना सहज नजरेस पडतात. २००८सालापेक्षाही अधिक भयंकर महापूर अनुभवल्याचे गोदाकाठावरील रहिवशांशी चर्चा केल्यावर लक्षात येते. गोदावरीवरील सर्वात लहान असलेला रामसेतूला पाणी शनिवारी दुपारी लागले होते. गंगापूर धरणातून सुमारे ७ हजार २१५ तर आळंदीमधून ९६१क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात सुरू आहे. पावसाची विश्रांती; बाजारपेठा गजबजल्याशनिवारी पावसाचे प्रमाण कमी झाले होते. पावसाने उघडीप दिल्यामुळे नाशिककरांना सुर्यदर्शनही घडले. शहरातील बाजारपेठाही गजबजल्या पहावयास मिळाल्या. अवघ्या दोन ते चार दिवसांवर बकरी ईद तसेच स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधनाचे सण येऊन ठेपल्याने दुसऱ्या शनिवारच्या सुटीमुळे बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली होती. मेनरोड,शालिमार, शिवाजीरोड, दहीपूल, नेहरूचौक, पंचवटी, रविवार कारंजा या भागात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती.गंगापूर पाणलोट क्षेत्रातील पाऊस (मिमीमध्ये)गंगापूर -०७गौतमी - १२त्र्यंबक - ६२अंबोली - ०५
गंगापूर धरण समुहातील साठागंगापर ८९.५६ टक्के भरले असून धरणात ५ हजार ४२ दलघफूपर्यंत जलपातळी पोहचली आहे. तसेच गंगापूर धरण समुहातील काश्यपी ९६.८६ टक्के, गौतमी ९३.५२ टक्के इतके भरले आहे. काश्यपीमधून ८४४ तर गौतमीमधून ५७०क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू आहे.