मुंबई येथे मंत्रालयात स्मार्ट सिटी योजनेच्या सादरीकरणानंतर बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत सीताराम कुंटे, प्रकाश थविल व मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे.मुंबई : नाशिक शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधांयुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्वत विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, त्याचप्रमाणे शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला स्वच्छ व सुंदर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिक जिल्ह्णाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सादरीकरण गुरुवारी (दि.१३) आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंत्रालयात केले त्यावेळी भुजबळ यांनी सूचना केल्या. नाशिक शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला असून, जुने गावठाण ही नाशिकची खरी ओळख आहे. त्यामुळे नाशिककरांच्या मागणीनुसार जुन्या क्षेत्राच्या विकासासाठी ५९८ एकरातील जुन्या गावठाणाची निवड करण्यात आली. स्काडा प्रणालीच्या सहाय्याने २४ तास पुरेशा दाबाने व शुद्ध पाणीपुरवठा गावठाणमध्ये करण्यात येणार आहे. स्वयंचलित पद्धतीने पुरेसा दाब, विविध ठिकाणी शुद्ध पाण्याची तपासणी, पाणीपुरवठा नलिकांमध्ये लिकेज डिटेक्शन स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवणुकीसाठी टाक्या बांधण्याचा खर्च, वॉटर फिल्टर उपकरणांवरील खर्च, तसेच पाणी साठवणुकीच्या प्रवृत्तीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय या गोष्टी टाळणे शक्य होणार आहे.गोदावरी नदी स्वच्छ झाल्याशिवाय स्मार्ट शहर होऊ शकत नाही. नदीमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी वेगळे करावे व त्यावर प्रक्रि या करण्यातयावी.नाशिक शहर स्मार्ट बनविताना शहराच्या मधून जाणारी गोदावरी नदी पर्यावरणाचे संरक्षण करून स्वच्छ व सुंदर बनविण्याचे निर्देश भुजबळ यांनी यावेळी दिले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा नाशिक स्मार्ट सिटीचे चेअरमन सीताराम कुंटे व स्मार्ट सिटी संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.पाण्याची होणार बचतयामुळे पाण्याची बचत होऊन सद्यस्थितीतील ४३ टक्क्यांवरील नॉन रेव्हेन्यू वॉटर १० टक्क्यांच्या खाली आणणे शक्य होणार आहे, तसेच स्वयंचलित प्रणालीमुळे कोठेही बिघाड झाल्याची माहिती आपोआप नियंत्रण कक्षात समजून ती दुरु स्ती तत्काळ करता येईल, असे विविध योजनांची माहिती घेतल्यानंतर भुजबळ यांनी सांगितले.
गोदावरीच्या स्वच्छतेला प्राधान्याची गरज : छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 1:17 AM
नाशिक शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधांयुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्वत विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, त्याचप्रमाणे शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला स्वच्छ व सुंदर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिक जिल्ह्णाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
ठळक मुद्देस्मार्ट सिटीच्या कामांचा मुंबईत घेतला आढावा