मनमाड : इगतपुरी येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने मेगाब्लॉक घेउन विविध कामे हाती घेण्यात आली असल्याने गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. या प्रवाशी गाडीला दररोज नाशिकपर्यंत चालवण्यात यावे अशी मागणी रेल्वेच्या मुख्य महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासन पुर्वसुचना न देता काही गाड्या रद्द करत आहे. मनमाड परिसरातील चाकरमान्यांची जीवनवाहीणी ठरलेल्या गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्याचा कालावधी वारंवार वाढवण्यात येत आहे.या मुळे मनमाड , नांदगाव, चांदवड, येवला या भागातून दैनंदीन कामकाजासाठी नाशिक येथे जा ये करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.सदरची गाडी निदान नाशिक किंवा देवळाली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत असल्याचे निवेदन मंडल रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समितीचे सदस्य नितीन पांडे, क्षेत्रीय समिती सदस्य कांतिलाल लुणावत यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिले आहे.
गोदावरी एक्सप्रेस नाशिक पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 6:12 PM