नाशिक : राज्य अग्रवाल महिला संमेलनाच्या १५व्या प्रांतीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरातून दाखल झालेल्या महिलांनी शनिवारी (दि.१७) मिरवणूक काढत वातावरणनिर्मिती केली. संध्याकाळी रामकुंडावर महिलांनी गोदाआरती करून ‘अग्र प्रेरणा’ अधिवेशनाचा बिगुल वाजविला.शहरात प्रथमच अग्रवाल समाजाच्या महिला मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय महिला संमेलन रविवारी (दि.१८) होत आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रकुंड येथून संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी अध्यक्ष मालती गुप्ता, चेअरपर्सन मीना अग्रवाल, महामंत्री उषा अग्रवाल, समाजाचे प्रांतीय अध्यक्ष विजयकुमार चौधरी, महामंत्री गोपालबाबू अग्रवाल, नाशिकचे अध्यक्ष नेमीचंद पोद्दार, महामंत्री विमल सराफ, ताराचंद गुप्ता, श्याम ढेडिया, डॉ. मुकेश अग्रवाल, एम. एम. मिठाईवाला आदी उपस्थित होते. सामूहिकरीत्या पारंपरिक पद्धतीने संध्याकाळी गोदाआरती करून गोदामाईचे पूजन करण्यात आले. पौरोहित्य सतीश शुक्ल यांनी केले.महिला सुरक्षा, महिलांविषयक कायदे, महिलांचे सामाजिक-आर्थिक सबलीकरण, ‘प्री-वेडिंग फोटो शूटिंग फॅड’वर बंदी आदी महत्त्वांच्या विषयांवर या संमेलनात चर्चा केली जाणार आहे. संमेलनाचे उद्घाटन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते होणार असून, महापौर रंजना भानसी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशन यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष वीणा गर्ग, संयोजिका डॉ. ममता अग्रवाल, सपना अग्रवाल, अलका अग्रवाल, संगीता ओम अग्रवाल, शशी अग्रवाल, अनिता मोदी, संगीता केडिया युवा मंचचे अध्यक्ष अंकित अग्रवाल, अक्षय अग्रवाल, सुशील केडिया, रवींद्र केडिया, प्रियंका अग्रवाल आदी परिश्रम घेत आहेत.सभागृहात मोरपंखांची सजावटमहिलांच्या संवेदनांचे प्रतीक असलेल्या मोरपंखांच्या संकल्पनेतून महिला अधिवेशन स्थळ सजविण्यात आले आहे. कोमलता, सौंदर्य आदी गुण दर्शविणाऱ्या मोरपंख या संकल्पनेतून सभागृहात सजावट करण्यात आली आहे. मोरपंखाच्या आकर्षक सजावटीमुळे सभागृहाचे रुपडे पालटले आहे.पुष्परांगोळ्यांनी सजले रामकुंडगोदाआरतीच्या निमित्ताने अग्रवाल महिला मंडळांच्या वतीने संपूर्ण रामकुंड, गंगा-गोदावरी मंदिर परिसर पुष्पांच्या रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. गंगा-गोदावरी मंदिराच्या परिसरात आकर्षक भव्य पुष्परांगोळी काढण्यात आली होती. तसेच सर्व पायºयांसह गोमुखही झेंडूंच्या फुलांनी सजविण्यात आले आहे.सांस्कृतिक कार्यक्रमाचा अधिवेशनस्थळी जल्लोषस्वामीनारायण सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी तरुणींसह महिलांनी विविध गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी राजस्थानी सण-उत्सवांवर आधारित लोकगीतांनी मने जिंकली. मालेगाव महिला मंडळाच्या नृत्य सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली. पूर्वसंध्येला रंगारंग सांस्कृतिक उत्सवाचा जल्लोष पहावयास मिळाला.
अग्रनारींकडून गोदाआरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:31 AM
राज्य अग्रवाल महिला संमेलनाच्या १५व्या प्रांतीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरातून दाखल झालेल्या महिलांनी शनिवारी (दि.१७) मिरवणूक काढत वातावरणनिर्मिती केली. संध्याकाळी रामकुंडावर महिलांनी गोदाआरती करून ‘अग्र प्रेरणा’ अधिवेशनाचा बिगुल वाजविला.
ठळक मुद्देशुभारंभाचा बिगुल : आज राज्यस्तरीय अग्रवाल महिला संमेलन