शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

गोदावरीला पूरसदृश परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:50 AM

गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे काठावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली.

नाशिक : गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे काठावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी (दि.२८) पावसाने शहरात उघडीप दिली. त्यामुळे शहरात कमी पाऊस पडला असला तरी गंगापूरचे पाणलोट क्षेत्र ओळखल्या जाणाºया त्र्यंबकेश्वर तालुक्यात मात्र जोरदार पाऊस झाला. तसेच गंगापूर धरण समूहाच्या परिसरात सोमवारी १२ तासांत ९० मि.मी. पाऊस झाला. रविवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण दुप्पट झाले. त्यामुळे दिवसभर गंगापूरमधून विसर्ग सुरूच होता. सातत्याने विसर्गामध्ये वाढ होत गेली. संध्याकाळी ५ वाजता दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाण्याची पातळी पोहचली होती; मात्र रात्री दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागले होते. कारण रात्री ८ वाजता सात हजार १०५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून सुरू करण्यात आला होता. यामुळे गोदावरीला संध्याकाळपासूनच पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे काठावरील विक्रेत्यांसह पूजाविधीसाठी आलेल्या भाविकांची धावपळ झाली. कपालेश्वरजवळील पाणपोईपर्यंत पाण्याची पातळी पोहचली होती. यामुळे गोदावरी प्राचीन मंदिरासह, गंगा-गोदावरी मंदिर निम्म्याहून अधिक बुडाले होते. तसेच निलकंठेश्वर मंदिराच्या नंदीपर्यंत पाणी पोहचले होते. तसेच देवमामलेदार मंदिराचे प्रवेशद्वारही पाण्याखाली गेले होते. एकूणच रात्री पाण्याची पातळी प्रचंड वाढल्याने अग्निशामक दलाकडून सतर्कतेचा इशारा दिला जात होता. गोदाकाठावरील वस्त्रांतरगृहा-पासून दुतोंड्यापर्यंत आणि रामसेतू पूल या ठिकाणांच्या विक्रेत्यांनी दुपारी ४ वाजेपासूनच व्यवसाय आवरण्यास सुरुवात केली. अग्निशामक दल्याच्या जवानांनी गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्याची सूचना दिल्यानंतर सर्वच विक्रेते सावध झाले. यावेळी विक्रेत्यांनी विक्रीस आणलेला माल, टपºया, पाणकापड असे साहित्य आटोपून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. तसेच तपोवनातील कपिला संगम येथील फळविक्रेत्यांनी दुपारी ३ वाजेपासनूच परिसर रिकामा करत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले होते.गंगापूर धरण ९४ टक्केगंगापूर धरण समूहात सोमवारी पावसाचे प्रमाण दुपटीने वाढले होते. आठ तासांत ९० मि.मी. पाऊस पडल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने सातत्याने विसर्ग वाढविला जात होता. गंगापूर धरणात ५ हजार २७१ दलघफू इतका पाणीसाठा असून, धरण ९४ टक्के भरले आहे. तसेच समूहातील काश्यपी, गौतमी-गोदावरी हे मध्यम स्वरूपाचे धरणे ९९ टक्के भरली आहेत. तसेच आळंदी धरण शंभर टक्के भरले आहे. एकूणच या चारही धरणे मिळून समूहात ९ हजार ९३२ दलघफू (९६टक्के) इतका पाणीसाठा आहे.