देवगाव : निफाड तालुक्यातील कानळद ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक अतिशय चुरशीची होऊन गोदावरी पॅनलने सदस्याच्या ७ पैकी ५ जांगासह थेट जनतेमधुन सरपंचपदी दणदणीत विजय मिळवला.राष्ट्रवादीचे माजी सरपंच शिवाजी सुपनर, नाना पगारे,सोमनाथ पारखे, सपंत जाधव, निफाड पंचायत समिती सदस्या गयाबाई सुपनर यांच्या गोदावरी पॅनलने सत्ता संपादन केली. प्रतिस्पर्धी माजी सरपंच शिवाजी जाधव यांच्या धुरंधर पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. सरपंच पदासाठी ३ उमेदवार रिगंणात होते. त्यात संरपच पदासाठी शांताराम भागवत जाधव हे ५२६ मतांनी विजयी झाले.गोदावरी पॅनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे विनोद जाधव(१५८), सिकंदर संपत मोरे(२२३), सर्जेराव पारखे(३१२), अरु णा जाधव(३१३), रु क्मिणी पगारे(३०७) तर धुरंधर पॅनलचे विजयी उमेदवार ताराबाई पारखे(१६४)सुलोचना पारखे(१७८).गावचा विकास करण्यासाठी कटिबद्धगावचा सर्वागिण विकास साधण्यासाठी मतदारांनी जो विश्वास दाखवला. त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारे तडा जावु न देता सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू.- शांताराम जाधव, नवनिर्वाचित सरपंच
कानळद ग्रामपालिकेत गोदावरी पॅनलची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 6:46 PM
देवगाव : निफाड तालुक्यातील कानळद ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक अतिशय चुरशीची होऊन गोदावरी पॅनलने सदस्याच्या ७ पैकी ५ जांगासह थेट ...
ठळक मुद्देराष्ट्रवादीचे माजी सरपंच शिवाजी सुपनर, नाना पगारे,सोमनाथ पारखे, सपंत जाधव, निफाड पंचायत समिती सदस्या गयाबाई सुपनर यांच्या गोदावरी पॅनलने सत्ता संपादन केली