वसंत तिवडेलोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : येथे सध्या सर्वात मोठी समस्या आहे जोरदार पावसाची आणि सर आली तरी गावात मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची भिती लोक बाळगु लागले आहेत. कारण १० ते १५ मिनिटे जरी जोरदार पाऊस पडला तरी पुर हमखास येणारच. त्यामुळेच या भागातील रहिवाश्यांची झोप उडाली आहे. इतकी धास्ती त्र्यंबकेश्वरवासियांनी घेतली आहे.त्र्यंबकेश्वरला पाउस येत नव्हता तर लोक वरु ज राजाची करु णा भाकत होते. आता पाउस सुरु झाला तर तो अधुन मधुन पुर काढत आहे. एकतर गावात थेट नदीपात्रात लोकांचे अतिक्र मण तसेच आपल्याकडील नको असलेल्या वस्तु थेट पाण्यात टाकण्याचे धाडस येथील लोक करतात. हे सर्व भंगार कुठे तरी अडते परिणामी पाणी पुढे जाण्यास अडथळे निर्माण होतात.यासह गंगास्लॅबवरील भाजी मंडईतील दुकानदार दुकानासमोरील कचरा झाडुन स्लॅबवरील एअरहोल मधुन गंगापात्रात टाकतात. दररोजचा हा कचरा तसेच मुळातच गोदापात्रात गाळ माती जास्त वाढल्याने गोदापात्राची उंची रस्त्यापासुन कमी झाली आहे. तसेच पात्राची साफ सफाई, गाळ काढणे उन्हाळ्यातच करावयास हवे ते. मात्र ते न केल्याने गावात जरा देखील पाणी वाढले तरी पुर येतो. ही वस्तुस्थिती आहे.लोकांनी गंगापात्र साफ करण्याची ओरड केली. गावात पुर येण्याची कारणे शोधण्यासाठी दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी प्रयत्न केला असता त्यांनी तातडीने गंगापात्र साफ करण्याचे आदेश दिले. पात्र थातुर-मातुर स्वरु पात साफ सफाई केली. पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता.त्र्यंबकेश्वर शहरात कधी नव्हे पण याच वर्षी अशी आपत्ती का ओढवली. त्र्यंबकेश्वरला यापुर्वी अनेक वेळा पुर येऊन गेले. पण आता पर्यंत असे पुर कधी पाहिले नव्हते. सखल भागात पाणी दोन ते तीन फुटापर्यंत असते. सरकारी यंत्रणा देखील त्यांमुळे खडबडून जागी झाली. स्वत: जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष जाऊन ठिकठिकाणी पाहणी केली. रस्ते काँक्र ीटीकरण करण्याच्या हव्यासापायी नदीपात्र उथळ होत चालले आहे. याचा परिणाम नदीपात्रात हवा प्रकाश जवळपास बंदच झाला आहे.सध्या जोरदार पाऊस असल्याने सफाई कर्मचारी देखील शेवटी माणसेच आहेत. सध्या तरी पावसामुळे अपेक्षेप्रमाणे काम होत नाही. गावात अनेक ठिकाणी बेकायदा वाहन तळ अतिक्र मण अनेक ठिकाणी सखल जागी पाणी साचुन राहते. नुतन मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी नव्यानेच कार्यभार स्विकारला आहे. त्यामुळे अगोदर त्यांना नगर पालिकेची माहिती घ्यावी लगणार आहे. नंतर ते त्यावर निर्णय घ्यावे लागतील.‘रिव्हर सेवर योजना’ शासनाच्या सहकार्याने लवकरच अमलात येत असुन रिव्हरमध्ये गावातील सर्व ओहोळांचे पाणी गावात जावू न देता एकत्रितरित्या २ मीटर चॅनलद्वारे खंडेराव मंदीर तेथुन पार्किंग समोरु न कॉलेज मार्गावरु न जव्हार रोड मार्गाने गोदावरीत सोडणे अशी ही १७ कोटींची रिव्हर योजना आहे. तर सेवर योजना ५३ कोटींची आहे. गावातील सर्वच्या सर्व गटारी भुयारी गटार योजनेत समाविष्ट करणे हा उद्देश असल्याने यापुढे गावात पुर येणार नाही. तसेच गोदापात्रात जो गटारीच्या पाण्याचा चॅनल आहे तो वेगळा करणार आहे.- पुरुषोत्तम लोहगावकर, नगराध्यक्ष,त्र्यंबकेश्वर नगर परिषद.सध्याचा नगरपरिषदेचा कारभार नियोजनशून्य असुन सध्या पावसानी सरासरी दररोज 100 चया वर सरासरी असते. त्यामुळे गावात वारंवार पुराची भिती निर्माण होत असते. नुकताच त्र्यंबक करांनी मोठ्या पुराचाही अनुभव घेतला. नदीपात्र व्यविस्थत साफ केले नाही. पावसाळी नाले गटारींची सफाई पाउस सुरु होण्या पुर्वीच स्वच्छ होणे आवश्यक होते. नुकतीच रिव्हरसेवर योजना अंमलात येणार असल्याचे कळाले. ही योजना प्रत्यक्षात अंमलात आली, तर गावात पुराची भितीच नाही. शहरात रिव्हर सेवर योजना अंमलात आणली तर गावात नैसिर्गक ओहोळांचे पाणी सेवर मध्येरु पांतर होउन भुयारी गटारींमध्ये केल्यास गावात पुर येण्याची भितीच राहणार नाही.- पुरुषोत्तम कडलग, इंजिनिअर,त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक.सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील गोदावरी पुलाची रुंदी कमी करु न पुलाचीही उंची कमी केल्याने गोदावरीचे पाणी पुलावरुन वाहते. परिणामी दोन्ही बाजुने वाहनांची रांगच रांग लागते. या पुलाची रु ंदी वाढवुन उंची देखील वाढवावी. तसेच पुढील कदम (ओझर) यांच्या पेट्रोल पंप समोरील बाणगंगा नदीवरील पुलाचीही उंची कमी झाल्याने हा परिसर शेतासह जलमय झाला होता. जणु तासभर त्र्यंबकेश्वर शहराशी जगाचा संपर्क तुटला होता. या करिता पुलाच्या उंचीसह डिव्हायडर मध्ये खिडक्या ठेवा. जेणेकरु न पाणी जाता येईल.- उमेश सोनवणे, संस्थापक अध्यक्ष,संविधान विकास परिषद, त्र्यंबकेश्वर तालुका.गावात कचरा डेपोत देखील कचरा वाढत आहे. आम्ही कचरा डेपो परिसरात रहात असूयाने कचऱ्याची सतत दुर्गंधी येत असल्याने जवळच्या तहसिलदार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, श्री पॅलेसमधील यात्रेकरु तसेच सोनवणे, गांगुर्डे यांच्या घरातील ४/५ माणसे आजारी पडल्याने त्यांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच दुर्गा पॅलेस परिसरातही दुर्गंधी येत असल्याने नुतन मुख्याधिकारी यांनी सर्व प्रथम कचºयाची विल्हेवाट लावावी.- मधुकर लांडे, सामाजिक कार्यकर्ता.
त्र्यंबककरांची सर्वात मोठी डोकेदुखी गोदावरी पुराची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 10:38 PM
त्र्यंबकेश्वर : येथे सध्या सर्वात मोठी समस्या आहे जोरदार पावसाची आणि सर आली तरी गावात मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची भिती लोक बाळगु लागले आहेत. कारण १० ते १५ मिनिटे जरी जोरदार पाऊस पडला तरी पुर हमखास येणारच. त्यामुळेच या भागातील रहिवाश्यांची झोप उडाली आहे. इतकी धास्ती त्र्यंबकेश्वरवासियांनी घेतली आहे.
ठळक मुद्देगोदापात्रात गाळ माती जास्त वाढल्याने गोदापात्राची उंची रस्त्यापासुन कमी झाली आहे.