शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

गोदावरीला पावसाळ्यातील पहिला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 1:32 AM

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणसाठा दुपारी ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी दुपारी दोन वाजेपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात एक हजार क्यूसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले.

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणसाठा दुपारी ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी दुपारी दोन वाजेपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात एक हजार क्यूसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे सायंकाळपर्यंत पारंपरिक पर्जन्यमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत बुडाली. रात्री आठ वाजेपर्यंत ७ हजार ८३३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीला या हंगामातील पहिला पूर आला.यावर्षी उशिराने पावसाला राज्यासह जिल्ह्यात सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांमध्ये जुलैअखेर पावसाने जोर धरल्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून नव्या स्वरूपात पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली. गंगापूर धरणाचा साठा २० टक्क्यांपर्यंत खाली गेल्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेत अंमलबजावणीही केली, मात्र जुलैअखेर पाणलोट क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर, अंबोली या भागात वरुणराजा जोरदार बरसल्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली.पंधरवड्यात धरणसाठा निम्म्यावर पोहोचला, मात्र या १४ दिवसांत पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सोमवारी (दि.२९) सायंकाळी गंगापूर धरण ८३.४३ टक्के इतके भरले. दुपारी बारा वाजेपर्यंत धरणाची पाण्याची पातळी ८० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने जलसंपदा विभागाकडून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गोदावरीच्या पातळीत सायंकाळपर्यंत मोठी वाढ झाली. सायंकाळी दुतोंड्या मारुती कमरेपर्यंत बुडाला, तर गंगा-गोदावरी मंदिरासह वस्त्रांतरगृहातही पाणी शिरले. गोदाघाटावरील लहान पूल, मंदिरे पाण्याखाली गेली. देवमामलेदार मंदिर, नीळकंठेश्वर मंदिरासह नारोशंकर मंदिराच्या पायऱ्याही पुराच्या पाण्यात बुडाल्या. तसेच रात्री ९ वाजता कपालेश्वर पोलीस चौकीसमोरील पाणपोयीला पुराचे पाणी लागले.दुपारपासूनच महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशामक दलाच्या जवानांकडून गोदाकाठावर धरणातून केल्या जाणाºया विसर्गाची पूर्वसूचना दिली जात होती. यामुळे विक्रेत्यांनी तत्काळ नदीकाठापासून आपली दुकाने सुरक्षितस्थळी हलविली. नागरिकांनी गोदाकाठालगत असलेली वाहने काढून घेतल्यामुळे कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवली नाही, तसेच दुर्घटनेलाही निमंत्रण मिळाले नाही. गंगापूर धरणातून होणाºया विसर्गाची पूर्वसूचना मिळाल्याने गोदाकाठावरील रहिवाशांसह विक्रेतेही सतर्क झाले होते. गोदावरी दुथडी भरून वाहू लागल्याने पुलाला पुराचे पाणी लागले होते.पूर पाहण्यासाठी गर्दीगोदावरीला आलेला या हंगामातील पहिला पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी गोदाकाठावरील अहिल्यादेवी होळकर, संत गाडगे महाराज, टाळकुटेश्वर या मोठ्या पुलांवर गर्दी केली होती. त्यामुळे मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजा मार्गावर वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी निर्माण झाली होती.विसर्ग वाढण्याची शक्यतागंगापूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाण्याचा जोर टिकून राहिल्यास रात्रीतून विसर्गात पुन्हा वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदाकाठालगत हाय अलट देण्यात आला आहे. निफाड तालुक्यात गोदाकाठी राहणाºया नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोदावरी नदीपात्रात गंगापूर धरणातून रात्री ८ वाजता ७ हजार ८३३ क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविला गेला. दर दोन तासांनी हजार ते दीड हजार क्यूसेकने विसर्गामध्ये वाढ करण्यात आली.होळकर पुलाखालून ९ हजार ४७० द.ल.घ.फू. पाणी प्रवाहित४गंगापूर धरणातून सोडण्यात आलेले ६ हजार ५०० क्यूसेक पाणी तसेच दिवसभर शहरात सुरू असलेल्या पावसाच्या मध्यम सरींमुळे शहरातील पावसाचे पाणी असे एकूण गोदावरीच्या होळकर पुलाखालून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ९ हजार ४६७० द.ल.घ.फू.पर्यंत पाणी पुढे रामकुंडात प्रवाहित झाले. त्यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. त्यामुळे तपोवनामधील लोखंडी पुलावरून पाणी गेले.सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूपधरणातून हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला. गोदापात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली असतानाही नागरिक धबधब्याजवळ धोकादायक पद्धतीने उभे राहून सेल्फी काढताना दिसून आले.

टॅग्स :Rainपाऊसgodavariगोदावरीfloodपूर