शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

नाशकात मराठा समाजाचा देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानी थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 3:52 PM

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या ठोक आंदोलनात फडणवीस सरकारने निलेश राणेंसारख्या व्यक्तींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा क्रांती मोर्चात फुट पाडण्याचे पाप करू नये. अन्यथा सरकारला  मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात अला असून  मराठा समाजाच्या भावना लोकप्रतिनिधींनी सरकारपर्यंत पोहचविण्याची मागणी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाने शनिवारी (दि.४)आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलनाच्या माध्यमातून केली. 

ठळक मुद्देआमदार देवयांनी फरांदे यांच्या निवासस्थानी थाळीनादमराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनसरकार समाजात फुट पाडत असल्याचा आंदोलकांचा आरोप

नाशिक :मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या ठोक आंदोलनात फडणवीस सरकारने निलेश राणेंसारख्या व्यक्तींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा क्रांती मोर्चात फुट पाडण्याचे पाप करू नये. अन्यथा सरकारला  मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात अला असून  मराठा समाजाच्या भावना लोकप्रतिनिधींनी सरकारपर्यंत पोहचविण्याची मागणी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाने शनिवारी (दि.४)आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलनाच्या माध्यमातून केली. आरक्षणांसह अन्य मागण्यांसाठी  राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला असून नाशिक जिल्ह्यात आमदारांच्या निवासस्थानासमोर बोंबाबोब, थाळीनादासोहत ठिय्या आंदोलनाची मालिका सुरू आहे. या आंदोलनाच्या शृंखलेत शनिवारी आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानासमोर सुनिल बागूल यांच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन केले. राज्यात आंदोलक आक्र मक झाल्यानंतर सरकारच्या हालचाली गतीमान झाल्या असल्या तरी  सरकार मराठा समाजाता गैरसमज निर्माण करून फुट पाडण्याच्या हेतूने लुडबुड्यांचा वापर करीत असल्याचा आरोप यावेळी करीत आंदोलकांनी केला. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रक्रीयेला गती देण्यासह, बिनव्याजी कर्ज पुरवठा, छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती, सारथी यासारख्या निर्णयांची अंमलबजावणी तत्काळ करावी आदि मागण्या करतानाच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी करण्यात आल्या.दरम्यान, देवयानी फरांदे यांनी मराठा समाजाच्या भावना रास्त असल्याचे सांगत मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी करण गायकर ,राजू देसले, तुषार जगताप, गणेश कदम, उमेश शिंदे, तुषार गवळी, माधवी पाटील,पुजा धुमाळ, मनोरमा पाटील,चेतन शेलार, विलास जाधव, संदीप लभडे, अ‍ॅड. शरद कोकाटे, शरद तुंगार,मंगला शिंदे आदी उपस्थित होते. 

समाजात फूट पाडण्याचे षडयंत्रनिलेश राणे आणि रूपाली पाटील यांच्यात झालेल्या संभाषणाची ध्वनीफित सोशल मिडीयावर व्हायरल होत असून यात निलेश राणे यांच्या बोलण्यातून काही मराठा संघटनांचे प्रतिनिधी मराठा क्र ांती मोर्चाचे भांडवल करून सरकारसोबत तडजोड करीत असल्याचा संदेश पसरविला जात आहे. या ध्वनीफितीच्या माध्यमातून सरकारच्या हस्तकांचा मराठा समाजात फुट पाडण्याचा कुटील प्रयत्न असल्याचा आरोपही आंदोलकांनी यावेळी केला असून  तडजोड करणाºयांविरोधात सरकारने पुरावा जाहीर करण्याचे आव्हानही मराठा क्रांती मोर्चाने दिले आहे. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNashikनाशिकmarathaमराठाagitationआंदोलनreservationआरक्षण