लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : गोदाकाठ भागात बिबट्याची दहशत कायम असून, दहा दिवसांपूर्वीच तारु खेडले येथे बिबट्याला जेरबंद केले असले तरी परिसरात आणखी बिबटे असून, चाटोरी येथील विलास भगवंता हांडगे यांच्या गायीवर बुधवारी रात्री २ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी केले.लिंबालवन परिसरात राहणाऱ्या हांडगे यांनी घराशेजारीच गाय बांधलेली होती. रात्री बिबट्याने या गायीवर हल्ला चढवत जखमी केले. त्यामुळे बिबट्याची दहशत कमी होण्याचे नाव घेत नसल्याने या भागातील ग्रामस्थ दहशतीखाली आहे. सुगीचे दिवस सुरू झाले आहे आणि खरीप हंगामातील शेतकामाना वेग आला आहे. शेतकरी ,मजूर यांना आपल्या दैनंदिन कामासाठी दिवसभर शेतात जावे लागते, चाटोरी परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला लपण्यासाठी योग्य जागा आहे तसेच पाणी पिण्यासाठी जवळच गोदावरी नदी वाहत आहे , त्यामुळे बिबट्याच्या दहशीतीने शेतकरी घराबाहेर पडत नाही आण िशेत मजूर भीतीने शेतात काम करण्यासाठी येत नाही त्यामुळे अनेक शेतीचे कामे खोळंबली आहे परिसरातील अनेक कुत्रे देखील गायब झाली आहे या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी, कर्मचार्यांनी भेट देऊन जखमी गाय पिहली आण ियापरिसरात तात्काळ पिंजरा लावणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. गोदाकाठ भाग जवळपास साठ टक्के उसाने व्यापला आहे. शेतकरी शेतात वास्तव्यास असल्यामुळे जनावरे आहेत, बिबट्याला लपण्यासाठी ऊस, पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी जनावरे, कुत्रे आणि रानमांजर आहेत. त्यामुळे बिबट्याला अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा- शहाजी राजोळे, शेतकरी करंजगाव
गोदाकाठी बिबट्याची दहशत
By admin | Published: July 06, 2017 12:18 AM