नाशिक : दिपालीनगर परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील १५ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मनिषा प्रविण गाडेकर (४४,रा.गिरीश सोसा.) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने गस्तीवरील गुन्हे शोध पथक नेमके कशाचा ‘शोध’ घेत असतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील महिन्यात तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. यापैकी एकाही गुन्ह्याचा उलगडा अद्याप गुन्हे शोध पथकाला करता आलेला नसताना पुन्हा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सोनसाखळी चोरीची घटना घडली. एकूणच मागील महिन्याप्रमाणे या महिन्यातही सोनसाखळी चोरीच्या घटनेचे खाते उघडले गेले. एकूणच मुंबईनाका पोलिसांसह संपुर्ण शहर पोलीस आयुक्तालयापुढे सोनसाखळी चोरी, घरफोड्यांचे वाढते गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.दिपालीनगर थांब्यापासून मंगळवारी (दि.४) गाडेकर या पायी घराकडे जात होत्या. यावेळी शर्मा मंगल कार्यालयाच्यासमोर अंतर्गत रस्त्यावरून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४० हजार रूपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरिक्षक चेतन श्रीवंत हे करीत आहेत.--
दिपालीनगरला पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 1:46 PM
मुंबईनाका पोलिसांसह संपुर्ण शहर पोलीस आयुक्तालयापुढे सोनसाखळी चोरी, घरफोड्यांचे वाढते गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
ठळक मुद्दे४० हजार रूपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा सोनसाखळी चोरी, घरफोड्यांचे वाढते गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान