नाशिक : दीपालीनगर परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी मनीषा प्रवीण गाडेकर (४४, रा. गिरीश सोसा.) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने गस्तीवरील गुन्हे शोध पथक नेमके कशाचा ‘शोध’ घेत असतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील महिन्यात तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. यापैकी एकाही गुन्ह्याचा उलगडा अद्याप गुन्हे शोध पथकाला करता आलेला नसताना पुन्हा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सोनसाखळी चोरीची घटना घडली. एकूणच मागील महिन्याप्रमाणे या महिन्यातही सोनसाखळी चोरीच्या घटनेचे खाते उघडले गेले. एकूणच मुंबई नाका पोलिसांसह संपूर्ण शहर पोलीस आयुक्तालयापुढे सोनसाखळी चोरी, घरफोड्यांचे वाढते गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.दीपालीनगर थांब्यापासून मंगळवारी (दि.४) गाडेकर या पायी घराकडे जात होत्या. यावेळी शर्मा मंगल कार्यालयासमोर अंतर्गत रस्त्यावरून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हे करीत आहेत.पादचारी युवकाचा मोबाइल खेचलागंगापूररोडवर परिसरातून पायी जात असलेल्या एका युवकाच्या हातातील मोबाइल अज्ञात दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून पोबारा केल्याची घटना मंगळवारी (दि.४) संध्याकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी प्रतीक साहेबराव खैरनार (२१, रा. उत्सव अपार्टमेंट, पूर्णवादनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.इंदिरानगरला चंदनवृक्ष कापलेकाही दिवसांपूर्वीच एका कारखान्यातील चंदनवृक्ष चोरट्यांनी कापून गायब केले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील सिमेन्स कॉलनी येथील एका बंगल्याच्या आवारातील दहा फूट उंचीच्या चंदनाच्या झाडावर अज्ञात तस्करांनी कटर चालविल्याची घटना उघडकीस आली आहे. महेंद्रसिंग यादवसिंग राजपूत (६९, रा. विराज हौसिंग सोसा.) या ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुमारे १० हजार रुपये किंमत असलेल्या ५ फूट चंदनाचा बुंधा कापून चोरट्यांनी गायब केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दीपालीनगरला सोनसाखळी हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 10:53 PM
दीपालीनगर परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी मनीषा प्रवीण गाडेकर (४४, रा. गिरीश सोसा.) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देगुन्हा दाखल : वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये संताप