नाशिक : पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना सातत्याने सुरुच आहे. शहरात सोनसाखळी चोरांची मोठी टोळी सक्रिय झाल्याची भीती महिलावर्गात व्यक्त होत आहे. सिडको, पंचवटी गंगापूररोड, शरणपूररोड, इंदिरानगर, देवळालीकॅम्प, उपनगर आदी भागात सातत्याने घटना घडू लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. दररोज विविध पोलिस ठाण्यांमध्ये सोनसाखळी चोरीचा एक तरी गुन्हा घडत आहे.सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना गंगापूररोड भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्मिता प्रशांत देवरे (रा.लोकमान्यनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. देवरे या शुक्रवारी (दि.२) आपल्या मुलीसोबत फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. गंगापूररोडने विद्याविकास सर्कलमार्गे जेहान सर्कलकडून फेरफटका मारूनमारत मायलेकी आपल्या घरी जात असताना शगुन डायनिंग हॉल समोर विरूध्द दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने देवरे यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एका पादचारी महिलेच्या गळ्यातील ५० हजाराची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना कॉलेजरोडच्या येवलेकर मळा परिसरात रात्री घडली.याप्रकरणी प्रितेश प्रकाश खटोड (रा. पणश्री अपाटर्मेंट) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बुधवारी रात्री प्रितेश हे त्यांच्या पत्नीसोबत येवलेकरमळा परिसरातून शतपावली करताना त्यांच्या पाठीमागून यामाहा दुचाकीने भरधाव आलेल्या चोरट्यांनी अचानक त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ५० हजार रूपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी लूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबड पोलीस ठाणे हद्दीत तिस?्या घटनेत भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेल्याची घटना गुरूवारी (दि.१) रात्री कामटवाडा भागात घडली.याप्रकरणी रंजना विलास वैद्य (रा. मटाले मळा, कामठवाडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वैद्य या पतीसमवेत रात्री साडेनऊच्या सुमारास पायी चालत जात असताना समोरून काळ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून पळ काढला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महिलांनी भाजी खरेदी करताना कापले मंगळसुत्रचौथी घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली.भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या आडगाव शिवारातील महालक्ष्मी नगर येथे राहणा?्या महिलेच्या गळ्यातील दिड तोळे वजनाची पोत अज्ञात तीन ते चार महिलांनी नजर चुकवून गळ्यातून लंपास केल्याची घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमाराला घडली आहे. याबाबत ज्योती सुरेश धोंगडे यांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.काल सकाळी धोंगडे परिसरात भाजीपाला खरेदीसाठी जवळ असलेल्या दुकानात गेल्या त्यावेळी अज्ञात तीन ते चार महिलांनी भाजीपाला खरेदी करण्याचा बहाणा करून धोंगडे यांच्या गळ्यातील 37 हजार रुपये किंमतीची पोत कशाच्या तरी सहाय्याने कापून नेत लंपास केली. काही वेळाने धोंगडे यांच्या गळ्यात असलेली पोत चोरी झाल्याचे निदशर्नास आले मात्र तो पावेतो चोरट्या महिलांनी घटनास्थळातून पलायन केले होते.