नाशिक : उघड्या घराच्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी हजारो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सिडकोतील राजरत्ननगरमध्ये घडली़
राजरत्ननगरमधील रहिवासी अरविंद जगताप यांच्या फिर्यादीनुसार रविवारी (दि़२) कुटुंबियांसह बाहेर जाण्याच्या गडबडीत त्यांच्याकडून घराचा मागील दरवाजा उघडाच राहीला़ ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून घरातील ४२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चार हजार रुपयांची रोकड असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़देवळातील जुगार अड्डयावर छापानाशिक : देवळाली कॅम्पच्या लेव्हिट मार्केटमध्ये जुगार खेळणाऱ्या दोन संशयितांना देवळाली कॅम्प पोलिसांनी मंगळवारी (दि़४) सायंकाळी छापा टाकून ताब्यात घेतले़ मनोज हरिचंद्र सोळुंकी (४२) व विठ्ठल जगन्नाथ भालेराव (५०, दोघे रा. जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. लेव्हिट मार्केटमध्ये सोरट जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली़ या संशयितांकडून २४५ रूपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़देवळातील दोन चोरट्यांना अटकनाशिक - देवळालीकॅम्प येथील सौभाग्यनगर परिसरात चोरीच्या उद्देशाने लपून बसलेल्या प्रविण ज्ञानदेव तागडे (रा.धनगर गल्ली,देवळाली कॅम्प) व जय राजेंद्र उगले (रा.वरची गल्ली,दे.कॅम्प) या दोघा संशयितांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने पाठलाग करून पकडले़ पोलिसांची चाहूल लागताच या दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला होता़ या संशयितांकडून कटावणीसह धारदार शस्त्र, मिरचीपुड असा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ या प्रकरणी पोलिस नाईक गंगाधर केदार यांच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन कारमधून कारटेपची चोरीनाशिक - सातपूरच्या संदीपनगरमधील रहिवासी बाळासाहेब साबळे यांनी आपली हुंडाई कार (एमएच- १५, एफटी ७६९९) ही महात्मानगर परिसरात पार्क केली होती़ चोरट्यांनी या कारच्या डाव्या बाजुची पुढील काच फोडून त्यातील टेप चोरून नेला़ तसेच नरेंद्र बग्गा यांच्या कारची (एमएच-१२ डीई-०९९६) फोडून त्यातील टेप व इतर वस्तू चोरून नेल्या़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गणेशवाडीत कुटुंबाला कोंडलेनाशिक : कुटुंबिय घरात असताना दरवाजास बाहेरून कडी लावून घेत कोंडल्याची घटना पंचवटीतील गणेशवाडीत घडली़ सचिन कायस्थ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते कुटुंबियांसह घरात असताना संशयित युवराज गायकवाड व त्यांच्या दोन साथीदारांनी घरास बाहेरून लावून घेतली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.