नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात मुंबईतील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक सुवर्णपदकांची कमाई करीत बाजी मारली, तर पुण्यातील विद्यार्थ्यांनी १२ सुवर्णपदक मिळविले असून, नाशिकमधील अर्चना कोडीलकर, कादंबरी पाटील व वैशाली भिलोरे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.
आरोग्य विद्यापीठाच्या अधिसभागृहात बुधवारी (दि. २) पार पडलेल्या एकविसाव्या दीक्षांत समारंभात पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या १० हजार ६८ विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. यातील ७३ विद्यार्थ्यांना ९८ सुवर्णपदकासह संशोधन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ३९ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे ५१३, दंत विद्याशाखा पदवीचे २०४१, आयुर्वेदाचे १०२१, युनानीचे ७०, होमिओपॅथीचे ९३६, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग १७४४, पीबी बी.एस्सी. नर्सिंगचे ३३६, बी.पी.टी.एचचे १५०, बी.ओ.टी.एचचे १४, बी.ए.एस.एल.पीचे ३१, बी.पी.ओ.चे ३, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्रीचे ०६ विद्यार्थ्यांना, तसेच पदव्युत्तर विद्याशाखेतील एम.डी. मेडिकलचे २१४१, दंतचे ४६१, आयुर्वेद ९३, होमिओपॅथी ५३, युनानी ४, डी.एम.एल.टी.७८, पॅरामेडिकल १०४, अलाईड (तत्सम) २७२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
--
यांना मिळाले सुवर्णपदक
मुंबई
अर्षिया चौधरी
विक्रांत महाजनी
इशा आनंद
प्रिया शाह
ऋषभ रावत
दर्शन ठक्कर
मेक्षा सकारिया
भक्ती डोंगरे
श्रीराम मते
सुरभी
एस जी पूजा
क्षितिजा काळे
पौर्णिमा खाडंगा
निधिशा साध्वानी
अमोल चव्हाण-
एस अर्चना-
डॉली बाशानी
नेहल मेहता
लक्षिता लद्दड
अविनाश प्रकाश
विवेक दुबे
असीम गार्ग्वा
सुरेंद्र साबा
श्रृती बाबू
शर्वरी मिरल
नम्रता इंगवले
शाल्वी वोरा
करून भाटीया
कीर्ती गायकवाड
शार्जिया सिद्धकी
सोनाली तेलंगे
फरान कुरेशी
जान्हवी मालवनकर
चैताली कोडम
आषेल जोस
श्रेया गोसार
कौशली शाह
--
हेगडे सानित्र - नवी मुंबई
अश्विनी पवार
--
अनुष्का पाटील -पुणे
माहिम भट्ट
निखिता दत्त
अनुजा माकन
प्रियल भार्गव
अंकिथा थम्मनिदी
समरीन सिद्धकी
शिवा कुमार
श्रेयस काटे
खुशबू गोएल
सिद्धार्थ मणी
ए. के . बिंदू
--
शेख आयशा - रत्नागिरी
मानसी शिंदे -पालघर
प्रतीक्षा मेश्राम - बुलढाणा
आर गोकुळकृष्णन - चंद्रपूर
विरेश बिराजदार - नांदेड
शीतल मेश्राम -
--
पर्मेश्वरी एल - औरंगाबाद
उमेश बेडेकर
पल्लवी पगडळ -
आशिष राजन
--
नेहा मिश्रा - सोलापूर
अमृता महाजन
हार्दिक मोरे - धुळे
रेहा गंधम - कोल्हापूर
गायत्री सोपान
--
गार्गी पाटील - सांगली
भावना वळवी - नागपूर
अभिनंध कृष्णा