शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

फाळके पुरस्काराची सुवर्णमहोत्सवी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 1:06 AM

धनंजय वाखारे।नाशिक : नाशिकपासून जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री जन्मलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाºया दादासाहेब फाळके पुरस्काराची सुवर्णमहोत्सवी वाटचाल सुरू झाली आहे. पुढील वर्षी देण्यात येणारा पन्नासावा फाळके पुरस्कार वितरण सोहळा दादासाहेबांच्या कर्मभूमीत नाशिकक्षेत्री व्हावा, अशी अपेक्षा नाशिककरांच्या वतीने व्यक्त केली जात आहे. ...

धनंजय वाखारे।नाशिक : नाशिकपासून जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री जन्मलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाºया दादासाहेब फाळके पुरस्काराची सुवर्णमहोत्सवी वाटचाल सुरू झाली आहे. पुढील वर्षी देण्यात येणारा पन्नासावा फाळके पुरस्कार वितरण सोहळा दादासाहेबांच्या कर्मभूमीत नाशिकक्षेत्री व्हावा, अशी अपेक्षा नाशिककरांच्या वतीने व्यक्त केली जात आहे. पुरस्काराच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत आतापर्यंत सहा मराठी कलावंतांना फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.चित्रपटमहर्षि दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दरवर्षी भरवल्या जाणाºया राष्टÑीय चित्रपट सोहळ्यात फाळके पुरस्कार प्रदान केला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीत असामान्य व देदीप्यमान कामगिरी करणाºया कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९६९ मध्ये भारत सरकारने या पुरस्काराची सुरुवात केली. सुरुवातीला ढाल, शाल व ११ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यानंतर अनेकवेळा पुरस्काराच्या रकमेत व स्वरूपात बदल करण्यात आला. सन २००६ पासून सुवर्णकमळ व १० लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या त्या अभिनेत्री देविका राणी. त्यानंतर निर्माता बी. एन. सरकार, अभिनेता पृथ्वीराज कपूर (मरणोत्तर), संगीतकार पंकज मलिक, अभिनेत्री सुलोचना, दिग्दर्शक बी. एन. रेड्डी, अभिनेता व दिग्दर्शक धीरेन गांगुली, अभिनेत्री कानन देवी, दिग्दर्शक व लेखक नितीन बोस, संगीतकार रायचंद बोराल, अभिनेता सोहराब मोदी, अभिनेता जयराज, संगीतकार नौशाद, अभिनेता व दिग्दर्शक एल.व्ही. प्रसाद, अभिनेत्री दुर्गा खोटे, दिग्दर्शक सत्यजित रे, अभिनेता व निर्माता व्ही. शांताराम, निर्माता बोम्मीरेड्डी नागी रेड्डी, अभिनेता राज कपूर, अभिनेता अशोक कुमार, गायिका लता मंगेशकर, अभिनेता अक्किनेनी नागेश्वर राव, दिग्दर्शक व निर्माता भालचंद्र पेंढारकर, संगीतकार भूपेन हजारिका, गीतकार मजरुह सुलतानपुरी, अभिनेता दिलीप कुमार, अभिनेता डॉ. राजकुमार, अभिनेता शिवाजी गणेशन, गीतकार प्रदीप, दिग्दर्शक बलदेव राज चोप्रा, दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी, पार्श्वगायिका आशा भोसले, दिग्दर्शक यश चोप्रा, अभिनेता देव आनंद, दिग्दर्शक मृणाल सेन, दिग्दर्शक अटूर गोपालकृष्णन्, दिग्दर्शक श्याम बेनेगल, दिग्दर्शक तपन सिन्हा, पार्श्वगायक मन्ना डे, चलचित्रकार व्ही. के. मुर्ती, निर्माता डी. रामानायडू, दिग्दर्शक के. भालचंदर, अभिनेता सौमित्र चॅटर्जी, अभिनेता प्राण, संगीतकार गुलजार, अभिनेता शशी कपूर, अभिनेता मनोजकुमार व दिग्दर्शक के. विश्वनाथन हे सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.  पन्नास वर्षांच्या या वाटचालीत ६ मराठी कलावंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर ३ अभिनेत्री, १७ अभिनेते, २ निर्माते, १२ दिग्दर्शक, ४ संगीतकार, १ गायक व २ पार्श्वगायक पुरस्काराने विभूषित झाले आहेत. पुरस्कारावर अभिनेत्यांनीच आपले वर्चस्व गाजविले आहे. पृथ्वीराज कपूर या एकमेव अभिनेत्याला मृत्यूपश्चात पुरस्काराने गौरविले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाºया कपूर घराण्यातच तीनवेळा फाळके पुरस्कार गेला आहे.