नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या गुुरुवारी (दि.२५) झालेली ऑनलाईन सभा आरोग्य, शिक्षण व महिला बालकल्याण विभागावर सदस्यांनी केेलेल्या गलथान कारभाराच्या आरोपांमुळे वादळी ठरली झाली. आरोग्य विभागातील भरती प्रक्रीया आणि महिला सबलीकरण योजनांमधील गलथान कारभारावर सदस्यांनी ताशरे ओढत, महिला बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांस सदस्यांनी धारेवर धरले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत, शाळा दुरूस्ती, सरंक्षण भिंत व कुंपन बांधकाम यासह १५ व्या वित्त आयोगातून करावायाच्या विकास कामांविषयी सदस्यांनी प्रश्नांती सरबत्ती करताना विविध योजनांमधील समस्या नूमद करीत सभागृहात प्रश्नांचा अक्षरश: पाऊस पाडला. मनिषा पवार यांनी गिरणा एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमधील पोषण आहारातील भ्रष्टाचाराबाबत विचारणा करी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शाळा दुरूस्ती प्रस्तावाचीही माहिती देताना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची तारंबळ उडाल्याने डॉ. आत्माराम कुंभार्डे, अमृता पवार यांसारख्या जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.रखडलेली विकसाकामांच्या मान्यता आणि कुपोषणाच्या मुद्यावरही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाची कोंडी केल्याने प्रशासकीय अधिकऱ्यांना ऑनलाईन सभेतही विविध प्रश्नांवर पुढील एक दोन दिवसात स्पष्टीकरण देऊ असे सांगण्याची नामूष्की ओढवली. आरोग्य विभागात कंत्राटी वाहन चालक व सफाई कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सिंग पध्दतीने नियुक्ती करण्यासाठी संस्था ठरवण्याबाबतची निविदा प्रक्रिया ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर का ओढावली, यांसर्भात शासन आणि जिल्हा परिषद प्रशासनात समन्वय आहे कीन नाही असा सवाल उपस्थित करतानाच या प्रकरणात निविदा प्रक्रिया खर्चा वाया गेला असून सभागृह आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांनाही अंधारात ठेवल्याचा गंभीर आरोह सदस्यांनी केला. कंत्राटी वाहन चालक व सफाई कर्मचाऱ्यांचे मानधन काढून घेत छळवून सूूरू आहे. आरोग्य केंद्रांना अधिकारी राहत नाही, आरोग्य केंद्रांच्या निर्लेखन प्रस्ताव, शालांच्या वर्ग खोल्या निर्लेखन प्रस्ताव, डॉक्टर मुख्यालयी राहत नाही अशा तक्रारींचा सदस्यांकडून यावेळी पाऊस पडला. चर्चेत नूतन आहेर, कविता धाकराव, उदय जाधव, महेंद्र काले, सिद्धार्थ वनारसे आदी सदस्यांनी सहभाग घेत प्रशासनाला धारेवर धरले.
इन्फो -
महिला प्रशिक्षणात गैरव्यावहाराचा आरोप
महिला बालकल्याण विभागातील योजनेतंर्गत महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या पॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, एमचसीआयटी सारख्या प्रशिक्षणात मुख्य कंत्राटदार संस्थेमार्फेत अतिशय कमी शुल्कात दुय्यम संस्थांना काम देऊन प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात असून प्रशिक्षणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला.