नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निळ्या रेषेत करण्यात आलेली बांधकामे हटवावी लागणार आहे. तथापि, महापालिकेनेच अनेक बांधकामांना परवानग्या दिल्या असल्याने आता प्रशासन बघू- करूची भूमिका घेत आहे. तसेच या कामासाठी खासगी एजन्सी नियुक्तकरावी लागेल असे सांगून टाळाटाळ सुरू आहे. यासंदर्भात न्यायालयातही तक्रार करण्यात आली असून, आता ६ जून रोजी त्यावर न्यायालय निर्देश देणार आहे.गोदापात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला नदीपात्रालगतच्या निळ्या पूररेषतील बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे आदेश दिले आहेत. गावठाण भागातील जुन्या बांधकामांचा प्रश्न नाही. परंतु अनेक बांधकामे पूररेषा आखण्याच्या अगोदर झाली आहेत. गाभा क्षेत्राबाह्य असलेल्या या बांधकामांना महापालिकेनेच परवानगी दिली असून, आता ही बांधकामे हटविण्याच्या निर्देशामुळे महापालिकेला आपल्याच कामाचे मूल्यमापन करावे लागणार आहे.
गोदापात्रातील बांधकामांवर गंडांतर
By admin | Published: April 24, 2017 2:18 AM