शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

महापालिकेच्या तीन अधिकायांवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 1:11 AM

महापालिकेत विविध प्रकरणांत सुरू असलेल्या चौकशांना आता अंतिम रूप देण्याच्या हालचाली सुरू असून, त्याअंतर्गतच तीन अधिकाºयांची चौकशी पूर्ण झालेली असल्याने त्यांना अंतिम कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या अधिकाºयांची नावे जाहीर केली नसली तरी त्यांच्यावर गंडांतर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांनी दिलेल्या माहितीमुळे चौकशीच्या फेºयात अडकलेल्या अधिकाºयांचा रक्तदाब वाढला आहे.

नाशिक : महापालिकेत विविध प्रकरणांत सुरू असलेल्या चौकशांना आता अंतिम रूप देण्याच्या हालचाली सुरू असून, त्याअंतर्गतच तीन अधिकाºयांची चौकशी पूर्ण झालेली असल्याने त्यांना अंतिम कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या अधिकाºयांची नावे जाहीर केली नसली तरी त्यांच्यावर गंडांतर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांनी दिलेल्या माहितीमुळे चौकशीच्या फेºयात अडकलेल्या अधिकाºयांचा रक्तदाब वाढला आहे.  महापालिकेत वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे उघड होतात, त्यावर चर्चा होतात. महासभा आणि स्थायी समितीत चर्चा झाली की त्यावर चौकशी समिती नियुक्त केली जाते. तथापि, या समितींच्या बैठका अनियमित होतात आणि पुढे चौकशी सुरू असल्याच्या पलीकडे कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसते. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपातून उघड झालेल्या घोटाळ्यांवर पुढे काहीच कार्यवाही होत नाही. अशी स्थिती असल्याने अनेक समित्या गठित होऊन ‘जैसे थे’ आहे. सध्या महापालिकेच्या दस्तावेजानुसार एकूण ११ प्रकरणांत चौकशी समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्ततुकाराम मुंढे यांनी सर्व प्रलंबित चौकशी समित्यांवरील कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर आयुक्तांनी ज्या प्रकरणांची चौकशी पूर्ण होत आली आहे, त्यावर अंतिम निर्णय घेण्याची तयारी केली आहे. त्यानुसार तीन अधिकाºयांवर कारवाईसंदर्भातील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचे उत्तर आल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तथापि, या संबंधित अधिकाºयांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. योग्य वेळी त्या अधिकाºयांची नावे जाहीर करू, असे त्यांनी सांगितले.मनपात कर्मचारी संख्या भरपूरनगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी नाशिक महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत सात दिवसांत आकृतिबंध मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु महापालिकेनेच आकृतिबंधाचा प्रस्ताव सादर केलेला नसल्याने त्यावर कार्यवाही होऊ शकली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. सध्या महापालिकेतील रिक्त पदांचा आढावा आपण घेत असून, त्यानंतरच आकृतिबंध पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महापालिकेत सुमारे सात ते साडेसात हजार पदे मंजूर असून, त्यापैकी पाच हजार पदांवर कर्मचारी असल्याने कर्मचाºयांच्या बाबतीत अगदीच अडचण आहे अशी परिस्थिती नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका