मालेगाव : विवाह सोहळा म्हटला की हजारो वºहाडींची उपस्थिती आलीच.. नवरीच्या कलवऱ्यांचं नटणं.. वरमायांचा मानपान.. तर नवरोबांच्या मित्रमंडळींची ऐट त्यात अजून न्यारी.. पण हे सगळं आता थांबलंय.. त्याला कारणही तसेच आहे.. सध्या सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि लॉकडाउनचा वरचष्मा.. पण या सगळ्यातही त्यांनी आपला लग्न सोहळा घरातच उरकला आहे.. अर्थात सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच..मालेगावातील प्रसिद्ध व्यापारी नेमिचंद चोपडा यांचे चिरंजीव शुभम व नीलेश टाटिया यांची कन्या हिमानी यांचा विवाह अगदी साध्या पद्धतीने अवघ्या सात लोकांच्या उपस्थितीत घरातच पार पडला. सात जणांच्या उपस्थितीत घरातच शुभमंगल सावधान करत सोहळा पार पडला. सध्या संपूर्ण जगात कोरोना आजाराने धुमाकूळ घातला आहे.कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने देशात जमावबंदी आदेश आहे. जमावबंदी आदेशामुळे विविध सण-समारंभांवरदेखील बंधन आली आहेत. याचा परिणाम लग्न-समारंभदेखील झाला. पाल्याचा विवाह स्मरणात रहावा यासाठी अनेक पालकांनी यावर्षी ठरलेली विवाह तारीख रद्द करत पुढच्या वर्षी विवाह करण्याचे ठरविले. परंतु खोट्या प्रतिष्ठेला, हौसेला फाटा देत व शासनाच्या परंतु खोट्या प्रतिष्ठेला, हौसेला फाटा देत व शासनाच्या संचारबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करत चोपडा व टाटिया परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण केला.या विवाहासाठी भाऊबंदकी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना आमंत्रण न देता वधू व वराच्या आईवडिलांनीच पार पाडला. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाहाचे कौतुक होत असून, कॅम्प परिसरात एकच चर्चा आहे, ‘एक विवाह ऐसा भी’ या विवाहामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.------------------------विवाहाची तारीख पूर्वी ठरलेलीहोती. संचारबंदी असल्याने विवाहपुढे ढकलण्याचा अनेकांनी सल्ला दिला.शासन आदेशाचे पालन करून हौसमौजेलाफाटा देऊन घरातच विवाहाचा निर्णयघेतला.- नेमिचंद चोपडा, व्यापारी, मालेगाव
केवळ सात जणांच्या उपस्थितीत शुभमंगल...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 10:28 PM