लासलगाव : मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम नाही; सहा तासांनी मालगाडी पूर्ववतलासलगाव : रेल्वेस्थानक परिसरात कांदा भरण्यासाठी आलेल्या मालगाडीचे सहा डबे गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घसरले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ परिणाम होऊन धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. दुपारी अडीच वाजता मालगाडी पूर्ववत झाल्याने वाहतूकही सुरुळीत झाली.लासलगाव आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ असून, येथून दररोज एक किंवा दोन मालगाडी कांदा देशांतर्गत पोहोचविला जातो. यासाठी रेल्वेचा मोठा वापर केला जातो. गुरुवारी कांदा भरण्यासाठी आलेल्या मालगाडीचे सकाळी लूप लाइनवर सेंटिंग सुरू असताना एका क्र ॉसिंगवर गाडी रुळावरून घसरल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने गाडी थांबविल्याने शेजारील अप लाइनवर घसरलेले डब्बे कोसळले नाहीत. त्यामुळे रेल्वेची मोठी हानी टळली. सुदैवाने अप व डाऊनच्या मेन लाइनवर याचा परिणाम न झाल्याने रेल्वे गाड्या धीम्या गतीने सुरू होत्या. मनमाड येथून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर क्रेनच्या साह्याने उतरलेले डब्बे रुळावर घेतले. सुमारे सहा तासांच्या कालावधीनंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली. परराज्यात रवाना होण्यासाठी गुरुवारी अप साइडला असलेल्या लुप लाइनवर रेल्वे माल डबे मागे घेत असताना सेटिंगजवळ शेवटी गार्ड डब्याचे पुढील सहा डबे तांत्रिक बिघाड झाल्याने रूळावरून घसरले.परंतु लाइनला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचली नाही. घसरलेले डबे सुरळीत होत असताना रेल्वे गाड्यांचा वेग कमी होता. (वार्ताहर)
कांदा भरण्यासाठी आलेली मालगाडी घसरली
By admin | Published: January 28, 2017 12:30 AM