शाहरातील टोळीयुद्ध तसेच गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी पोलीस आयुक्तांमार्फत सराईत गुन्हेगारांवर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये (एमपीडीए) कायद्यानुसार कारवाईचा धडाका सुरू केला आहे. छोटू नायडू हा कॅम्प परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत होता. रेस्ट कॅम्प रोड, कॅथे कॉलनी, देवळाली कॅम्प, लेव्हिट मार्केट, देवी मंदिर परिसरात नागरिकांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटणे, मारहाण करणे, हाणामाऱ्यांसह हातगाडी विक्रेत्यांकडून बळजबरीने पैसे वसुली करीत धमकावत होता. छोटूविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंग, दंगल माजविणे, प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला. त्यानुसार छोटू यास पाण्डेय यांच्या आदेशानंतर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. फेब्रुवारीत चार सराईत गुंडांवर स्थानबद्धतेची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे. समज देऊनसुद्धा सराईत गुन्हेगारांच्या वर्तणुकीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले नाही, तर अशा गुंडांना थेट मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार असल्याचा इशारा पाण्डेय यांनी दिला आहे.
---
फोटो आर वर ०६ छोटू नावाने सेव्ह आहे.