नाशिक : औषधनिर्मात्या कंपनीकडे हॉस्पिटलच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे आॅर्डर करून सवलतीच्या दरात मागविलेल्या औषधे कमिशनवर रिटेलर्सला विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने गोळे कॉलनीतील दोन घाऊक विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच बारा घाऊक औषधविक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत़ याविरोधात बुधवारी (दि़२५) पासून घाऊक औषध विके्रत्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे़ याबाबत संघटनेचे पदाधिकारी अन्न व पुरवठामंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले असून, या भेटीनंतर बेमुदत आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गोरख चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली आहे़एफडीएच्या या कारवाईविरोधात बुधवारपासून जिल्ह्यातील सुमारे ५५० घाऊक विके्रत्यांनी दुकाने बंद ठेवत आंदोलन सुरू केले आहे़ शुक्रवारी (दि़२७) या बंदचा तिसरा दिवस होता़, तर संघटनेचे अध्यक्ष गोरख चौधरी यांच्यासह पदाधिकारी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या भेटीसाठी गेले आहेत़ (प्रतिनिधी)
गोळे कॉलनीतील घाऊक औषध विक्रेत्यांचा संप सुरूच
By admin | Published: January 28, 2017 1:11 AM