अमावस्या चे औचित्य साधून पिंपळगाव बसवंतला गोपूजनपिंपळगाव बसवंत :येथील उज्वल गोशाळेतील गायी आणि वासरांना पुरणाचे मांडे खाऊ घालण्यात आले गत अनेक वर्षांपासून येथील गोशाळेतील गायी वासरे व इतर जनावरांना प्रत्येक अमावस्येला पुरणपोळीच्यानैवद्यासहहिरव्याचाऱ्याचीमेजवानी येथील व्यापारी वर्गाकडून देण्यात येते.अकरा वर्षांपूर्वी प. पू. प्रीती सुधाजी महाराज यांच्या प्रेरणेतून ही गोशाळा सुरू करण्यात आली.कांदा व्यापारी व शहरातील काही दानशूर व्यक्तींनी पदरमोड करून पाच एकर जागा खरेदी केली. गोशाळा उभारून ती यशस्वीपणे चालविली आहे.पिंपळगाव बसवंत येथील गोशाळेत तब्बल ६२० गाई आहेत.कांदा व्यापारी कांदा खरेदी केलेल्या किंमतीपैकी १५ पैसे शेकडा याप्रमाणे येथे सरळ हाताने दान देतात. त्यामुळे निव्वळ कांदा व्यापार्यांकडून गोशाळेला वर्षाकाठी ६० ते ६५लाख रु पये उपलब्ध होतात. यासाठी गो शाळेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी ,सदस्य चंद्रकांत राका ,विजय बाफना, गणेश बनकर यांचे विशेष प्रयत्न असतात.तर पाण्याच्या ऐन टंचाईत पिंपळगाव बाजार समतिीकडून दररोज येथे टँकरने पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे जनावरांची तहान भागते गार्इंची देखभाल चारापाणी करण्यासाठी येथे एकोणवीस कामगार काम करतात या गोशाळेत गार्इंसह दोनशे ते अडीचशे कबुतरे मोर, घोडा आहे .शिवाय दक्षिण भारतातील पुंगणुर जातीच्या ठेंगण्या सात गाई सुद्धा येथे आहेत या गाई एका वेळी फक्त अर्धा लिटर दूध देतात त्या दुधाचा भाव २५० रु पये लिटर आहे . या गोशाळेत दूध शेण यांचा व्यापार केला जात नाही.दुभत्या गार्इंचे दूध वासरांना पाजले जाते काही अंध व अपंग गायी सुद्धा येथे आहे यांचाही सांभाळ केला जातो..स्थानिक कांदा व बेदाणा व्यापारी स्वखुशीने मदत देतात दर आमवशेला गोशाळेत जागेवरच वीस हजार रु पये निधी संकलित होतो.याच पैशातून गूळ पोळीचे नियोजन केले जाते या प्रसंगी, संकेत पारख ,शुभम जाधव ,अभिनंदन राका , अजित कुशारे ,केतन पुरकर, ,जॉनी ठक्कर, रवींद्र घुमरे, शितल भंडारी , आदींसह व्यापारी उपस्थित होते
अमावस्या चे औचित्य साधून पिंपळगाव बसवंतला गोपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 4:40 PM
पिंपळगाव बसवंत :येथील उज्वल गोशाळेतील गायी आणि वासरांना पुरणाचे मांडे खाऊ घालण्यात आले गत अनेक वर्षांपासून येथील गोशाळेतील गायी वासरे व इतर जनावरांना प्रत्येक अमावस्येला पुरणपोळीच्यानैवद्यासहहिरव्याचाऱ्याचीमेजवानी येथील व्यापारी वर्गाकडून देण्यात येते.
ठळक मुद्देदुपारी बारा वाजता गायी वासरांचे विधीवत पूजन करून किशोर ठक्कर ,चंद्रकांत राका,महावीर भंडारी, विजय सिनकर अल्पेश पारख महेश गांधी शितल बुरकुले आदींच्या प्रमुख उपस्थितीत गाय वासरांना मांडे भरविण्यात आले.