नांदगांव : येथील नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी जळगांव खुर्द येथील गोरख फिकरराव सरोदे यांची बिनविरोध निवड झाली. पुंजाराम जाधव यांनी रोटेशन नुसार राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात सोमवारी उपसभापतीपदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती पदासाठी सरोदे यांचा एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक एस.पी. कांदळकर यांनी जाहिर केले. नामनिर्देशन पत्रावर संचालक एकनाथ सदगीर व संचालक राजेंद्र देशमुख यांनी सुचक म्हणून सही केली. उपसभापती निवडीपूर्वी संचालक मंडळाची शिवसेना कार्यालयात बैठक होवून संस्थेचे मार्गदर्शक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे उपस्थितीत गोरख सरोदे यांचे नावावर एकमत झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रि या पार पडली. निवडणूकी वेळी बाजार समितीचे सभापती तेज कवडे , मावळते उपसभापती पुंजाराम जाधव , संचालक विलास आहेर , भरत शेलार , दत्तात्रय निकम, दिलीप पगार , हनुमान सानप , भाऊसाहेब हिरे , रामचंद्र चव्हाण ,श्रावण काळे , भास्कर कासार , प्रफ्फुल पारख , भाऊसाहेब सदगीर ,यज्ञेश कलंत्री , यशोदाबाई हेंबाडे , अलकाताई कवडे , सरला दिवटे , मनिषाताई काटकर मंगला काकळीज , सचिव अमोल खैरनार यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे ,मजूर फेडरेशन चे संचालक प्रमोद भाबड ,राजाभाऊ जगताप उपस्थित होते.
नांदगांव बाजार समिती उपसभापतीपदी गोरख सरोदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 2:22 PM