लोहोणेर : खर्डे येथील गोरक्षनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पतसंस्थेचे संस्थापक डॉ. बाबाजी ह्याळीज व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनोद देवरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला. पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उत्साहात मतदान होऊन सायंकाळी तत्काळ मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. पहिल्या फेरीपासून सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांची आघाडी वाढतच राहिली व सर्व मतमोजणीअखेर सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश देवघरे यांनी जाहीर केले. गोरक्षनाथ पतसंस्थेची स्थापना सन १९९९ मध्ये झाली असून, स्थापनेनंतर पहिल्यांदाच संस्थेला निवडणुकीला सामोरे जावे लागले. सत्ताधारी गटाच्या सहकार पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी : सर्वसाधारण जागा- दौलतराव राघू भामरे (२९३), भरत बाबूराव देवरे (२६२), विनोद धर्मराज देवरे (२८६), डॉ. बाबाजी दादाजी ह्याळीज (३३६), हंसराज नारायण जाधव (२८७), विजय जिभाऊ सोनवणे (२७९), बापू दौलत शिंदे (२६०), महिला राखीव गट- उषा महाले (२९९), सुशीला नानाजी निकम (२८५), इतर मागासवर्ग- गुलाबराव उखा पवार (३२५), अनुसूचित जाती-जमाती गट- कौतिक पवार (२८८), भटक्या विमुक्त गट- सीताराम शंकर बडगे (२९०) अशा १२ जागांसाठी १२ उमेदवार निवडून आले आहेत. (वार्ताहर)
गोरक्षनाथ पतसंस्थेवर सहकार पॅनलचे वर्चस्व
By admin | Published: September 02, 2016 10:24 PM