नाशिक : डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी शाखेच्या साक्षी राऊत व प्रगती मोरे या विद्यार्थिनींनी ‘मेच्स्टर्म २०२०’ या तांत्रिक शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम क्र मांक मिळविला. तर श्रेया सहाणे हिने द्वितीय क्र मांक मिळविला. के. के. वाघ तंत्रनिकेतन येथे घेण्यात आलेल्या एकदिवसीय तांत्रिक शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेमध्ये विविध तंत्रनिकेतनच्या ४० गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. राऊत व मोरे यांनी ‘क्लाउड कम्प्युटिंग’ व सहाणे हिने ‘डिजटल मार्केटिंग’ या विषयावर शोधनिबंधाचे सादरीकरण केले. सर्व गटांना मागे टाकत या विद्यार्थिनींनी प्रभावी सादरीकरण करत यश मिळविले. सदर विद्यार्थिनींना प्राचार्य प्रदीप देशपांडे, उपप्राचार्य पूनमचंद जैन, सारंग अजनाडकर, संतोष थोरात, गौरी पुराणकि, पूजा किल्लेवाले, अजित कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
शोधनिबंध स्पर्धेत गोसावी तंत्रनिकेतनचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 1:36 PM
डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी शाखेच्या साक्षी राऊत व प्रगती मोरे या विद्यार्थिनींनी ‘मेच्स्टर्म २०२०’ या तांत्रिक शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम क्र मांक मिळविला.
ठळक मुद्देशोधनिबंध सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम क्र मांक मिळविलाविविध तंत्रनिकेतनच्या ४० गटांत ही स्पर्धा घेण्यात आली ‘क्लाउड कम्प्युटिंग’ व ‘डिजटल मार्केटिंग’ या विषयावर शोधनिबंधाचे सादरीकरण