कै. गंगाधरदादा चोथवे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल चोथवे, उपाध्यक्ष महेंद्रकुमार तारगे यांच्याकडे सभारंभातच २१ हजार रूपयांची मदत सुपुर्द करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील रामनाथ चकोर यांची कन्या रूपाली व राहुरी (ता.नाशिक) येथील चंद्रकांत सांगळे यांचे चिरंजीव मंगेश यांचा विवाह सोहळा नुकताच नांदूरशिंगोटे येथे पार पडला. या लग्न समारंभात नवदाम्पत्य व त्यांच्या नातेवाईकांनी शाल, फेटे, टॉवेल, टोपी याचा खर्च टाळण्याचा निर्णय घेतला. सिन्नर येथे नाशिक-पुणे महामार्गालगत जिंदाल फाट्यासमोर चोथवे कुटुंबियांच्यावतीने हरिओम गोशाळेच्या माध्यमाने २५० ते ३०० भाकड गायींचा सांभाळ केला जातो. गायींचा सांभाळ करण्यासाठी अध्यक्ष राहुल व सचिव संजय चोथवे हे खिशातून खर्च भागवतात. त्यामुळे नवदाम्पत्यासह त्यांच्या परिवाराने गोसेवेसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. यावेळी क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे संचालक विनायकराव शेळके, माजी संचालक आनंदराव शेळके, माजी उपसरपंच सजन सानप, विकास चकणे, बाजीराव शेळके, संपत सानप, भाऊसाहेब वाळके, रामदास सानप, विलास सानप आदींसह नातेवाईक मंडळी उपस्थित होते.
लग्नातील मानपानाचा खर्च टाळून गोशाळेला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 5:15 PM