शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

पेटू लागल्या शेकोट्या

By admin | Published: December 27, 2015 10:23 PM

कडाका कायम : थंडीच्या बचावासाठी प्रयत्न

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पारा घसरल्याने कडाक्याच्या थंडीची लाट पसरलीआहे. या थंडीचा परिणाम चांगलाच जाणवत असल्यामुळे पंचवटी परिसरात दिवसाही शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सायंकाळी सात वाजेनंतर परिसरातील रस्ते निर्मनुष्य होऊन शुकशुकाट पसरत आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिक दिवसा व सायंकाळच्या सुमाराला कामानिमित्ताने घराबाहेर पडताना अंगात स्वेटर्स, डोक्यात कानटोपी, हातमोजे तर कोणी गळ्यात मफलर टाकूनच बाहेर पडत असल्याचे बघायला मिळते. एरवी सायंकाळच्या सुमाराला परिसरातील मंदिर तसेच चौकाचौकात थांबणारी तरुण मंडळी आता झाडाखाली सायंकाळच्या वेळी झाडाचा पालापाचोळा तसेच वृत्तपत्रांची रद्दी पेटवून तर कोणी झाडांची वाळलेली लाकडे पेटवून शेकोटी करून त्याभोवती फेर धरून बसलेली असतात. कडाक्याच्या थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरत असल्याने अनेक जण सायंकाळी सात वाजेनंतर घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तपमानात घट झाल्यामुळे पारा चांगलाच घसरला आहे. त्याचा परिणाम दिवसाही पूर्णपणे गारवा जाणवत असल्याने काही नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे पंचवटी परिसरात दिसून येत आहे. थंडीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही जाणवला असून ऐरवी वाहनांच्या वर्दळीने फुलणारे रस्ते थंडीमुळे काहीसे ओस पडले आहेत, तर सायंकाळच्या वेळी शालेय विद्यार्थ्यांच्या गर्दीने भरगच्च होणाऱ्या मैदानावरची गर्दी काहीशी ओसरली आहे. (वार्ताहर)