नाशिक : गौणखनिज स्वामित्वधनाच्या माध्यमातून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात मिळणारा महसूल जमा करण्यासाठी गौण खनिकर्म विभागाच्या वतीने जिल्ह्यातील थकबाकीदारांची यादी तयार केली असून, त्यांच्याकडून वसुलीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत या मोहिमेतून २० ते ३० लाख एकरकमी थकबाकी भरली जात असल्याने फेब्रुवारीच्या मध्यावर वसुलीचा टक्का वाढला आहे. मागील महिन्यात ६५ टक्का असलेली वसुली आता ७८ टक्क्यांवर पोहोचली आहे.जिल्ह्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या गौणखनिज स्वामित्वधनाच्या माध्यमातून डिसेंबरअखेर ६२ कोटींची वसुली करण्यात आली होती. वसुलीचे प्रमाण कमी तसेच खाणपट्टेधारकांकडून भरणा करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी भरारी पथकाची नियुक्ती केली होती. ९५ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट असतानाही त्यामध्ये अपेक्षित कामगिरी होत नसल्याने थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता नियमित भरणा आणि थकबाकीदारांनीदेखील स्वामित्वधनाचा भरणा केल्याने वसुलीत वाढ झालेली आहे. फेब्रुवारीच्या पंधरवड्यात ७४ कोटी ५८ लाखांची वसुली करण्यात आली. वसुलीचे हे प्रमाणे ७८.५१ टक्के इतके आहे.जिल्ह्णातील गौणखनिज वसुलीचे उद्दिष्ट ९५ कोटी असल्याने मार्चअखेरीच उर्वरित रॉयल्टी वसुलीची जबाबदारी गौणखनिज विभागाला पार पाडावी लागणार आहे. गौणखनिज स्वामित्वधनाच्या माध्यमातून जिल्ह्णाच्या तिजोरीत सर्वाधिक भर पडत असते. जिल्हा खनिकर्म विभागाकडून बजाविण्यात आलेल्या नोटिसा आणि दिलेल्या प्रत्यक्ष भेटीनंतर वसुलीला वेग आल्याचीमाहिती गौणखनिज अधिकारी पाटील यांनी सांगितले.येवला, नांदगाव आणि कळवण तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक वसुली झाली आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये अजूनही अपेक्षित वसुली होत नसल्याने अशा तालुक्यांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अर्थात काही ठिकाणी एक-दोनपेक्षा अधिक खाणपट्टे नसल्याने त्यांची वसुली येत्या आठवड्यात होईल, असा दावा केला जात आहे. नाशिक तालुक्यातील वसुली ८० टक्केच्यापुढे असल्याने येथील वसुलीदेखील शंभरी गाठू शकेल. इगतपुरी आणि सुरगाणा वगळता अन्य तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक वसुली झालेली आहे. येथील वसुलाला अधिक प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
गौणखनिज थकबाकीदारांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:46 AM
गौणखनिज स्वामित्वधनाच्या माध्यमातून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात मिळणारा महसूल जमा करण्यासाठी गौण खनिकर्म विभागाच्या वतीने जिल्ह्यातील थकबाकीदारांची यादी तयार केली असून, त्यांच्याकडून वसुलीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे२१ कोटींची प्रतीक्षा : अनेकांना बजाविल्या नोटिसा; भरणा सुरू